लॉकडाऊनमध्ये शहरातील धूलिकणात मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:02+5:302021-07-31T04:12:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेचा सन २०२०-२१ चा पर्यावरण अहवाल प्रसिध्द झाला असून कोरोनाकाळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेचा सन २०२०-२१ चा पर्यावरण अहवाल प्रसिध्द झाला असून कोरोनाकाळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या वर्षात शहरातील धूलिकणात मोठी घट झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे़ अहवालातील नोंदीनुसार रस्त्यावरील वाहतूक व इतर व्यावसायिक ठिकाणे बंद असल्याने सूक्ष्म धूलिकणात ३० मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटरने घट झाली आहे़ तर अतिसूक्ष्म धूलिकणात १० मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटरने घट झाली आहे.
याचबरोबर हवेच्या गुणवत्ता आलेखात गेल्या ३ वर्षांत उत्तम क्षेणीत असलेल्या पुणे शहराची श्रेणी सन २०२०२-२१ मध्ये १५ टक्क्यांनी वाढली आहे़ तर या वर्षात प्रत्येक दिवशी शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स (हवेच्या गुणवत्ता आलेखात) हा उत्तम श्रेणीत राहिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात शहरात व्यावसायिक भागांमधील विजेचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी झाला आहे़ तर सन २०१९-२० मध्ये १़५३ कोटी युनिटस्ाची सौरऊर्जा निर्मिती असलेल्या शहरात २०२०-२१ मध्ये दुपटीने म्हणजेच ३़०२ कोटी युनिटस्ाची सौरऊर्जा निर्माण झाली आहे़ तसेच या वर्षात ४९ हजार ५७७ सोलर वॉटर हिटरच्या वापरामुळे १.८२ कोटी युनिटची बचत झाली आहे.
-----------------
नवीन वाहन खरेदीत ३९ टक्के घट
पुणे शहरात सन २०२० मध्ये केवळ १ लाख ५१ हजार १६ नवीन वाहने खरेदी झाल्याची नोंद आरटी़ओ कार्यालयाकडे घेण्यात आली असून, सन २०१९ च्या तुलनेत यात ३९ टक्क्यांनी घट झाली आहे़ तर जानेवारी ते डिसेंबर, २०२० दरम्यान शहरात १३ हजार ९५० सीएनजी नवी वाहने घेण्यात आली. शहरात पीएमपीएमएलच्या २ हजार ४३१ बसपैकी १ हजार ७५९ बस सीएनजी आहेत़ एकूण बसच्या ७० टक्के बस या सीएनजीवर असून, सन २०२०-२१ मध्ये १५० ई-बसही मार्गावर धावत आहेत.