विदर्भाच्या किमान तापमानात मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 09:11 PM2018-11-10T21:11:52+5:302018-11-10T21:14:45+5:30
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून उर्वरित भागात किंचित घट झाली आहे.
पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. सर्वाधिक कमाल तापमान शनिवारी पणजी येथे ३५.८ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. विदर्भातील बहुतांश भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे़ मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात किंचित घट झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे १६.७, जळगाव १४, कोल्हापूर २१.८, महाबळेश्वर १६.४, मालेगाव१६.६, नाशिक १४, सांगली१८.३, सातारा १८, सोलापूर २०, मुंबई २३.५, सांताक्रुझ २१.६, अलिबाग २२.७, रत्नागिरी २३, पणजी २२़४, डहाणु २२.४, उस्मानाबाद १९.१, औरंगाबाद १४.४, परभणी १७.६, नांदेड २०, अकोला १४, अमरावती १६.४, बुलढाणा १५.२, ब्रम्हपुरी १४.६, चंद्रपूर १९.८, गोंदिया १२.८, नागपूर १२.७, वर्धा १५.८, यवतमाळ १५.