गावच्या विकासासाठी बडे कुटुंबीयांनी दिले पाच लाखांचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:38+5:302021-09-14T04:14:38+5:30
गुणोरे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, जिल्हा ...
गुणोरे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावच्या माजी सरपंच चंद्रभागा जयसिंगराव बढे यांच्यावतीने जयसिंग तात्या बढे यांच्या आठवणी जतन करीत पाच लाख रुपयांचे पेव्हिंग ब्लॉक दशक्रिया विधी घाट परिसरातील खाशाबा मंदिर परिसरात बसवण्यात आले. यावेळी राहुल पाटील शिंदे, जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी सभापती सुदाम पवार, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, माजी उपसरपंच सोपान भाकरे, गुणोरे गावचे सरपंच बाळासाहेब खोसे, उपसरपंच कचरशेठ कारखिले, जनसमृध्दी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र मेसे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब बढे, मुख्य व्यवस्थापक राजेश गोपाळे, पारनेर परिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर, सुहास शेळके, ज्ञानदेव कारखीले सर, बाजीराव गोपाळे, कारभारी मेसे, सबाजी मेसे, भाऊ किसन गोपाळे सर, आबा रासकर महेंद्र बढे, आम्ही गुणोरेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास बढे, मंगेश सालके, किसनराव सुपेकर, दादाभाऊ निमोणकर, माजी सरपंच पोपटराव कारखीले, माजी सरपंच बाळासाहेब दिघे, बाप्पू दिघे, सखाराम आढाव, सुरेश काणे, तंटामुक्ती उपाध्यक्ष भाऊसाहेब बढे, अण्णासाहेब बढे, सुभाष खोसे, संतोष गोपाळे आदी उपस्थित होते.