मोठी बातमी! दिल्लीतून आलेले १४ संभाव्य कोरोनाबाधित पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 11:12 AM2020-04-01T11:12:23+5:302020-04-01T11:13:58+5:30

तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी; त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक

Big news! 14 suspected municipalities from Delhi are hospitalized; | मोठी बातमी! दिल्लीतून आलेले १४ संभाव्य कोरोनाबाधित पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! दिल्लीतून आलेले १४ संभाव्य कोरोनाबाधित पिंपरी महापालिका रुग्णालयात दाखल

Next
ठळक मुद्दे१८ जणांचा शोध सुरू :कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे

पिंपरी:  दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी ३५ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.आता  त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली असूनत्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या 'एनआयव्हीकडे' तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.    हे लोक किती जणांच्या  संपर्कात आले असतील हे सांगणे कठीण आहे.  आणखी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 
दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीग ए जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमानत हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच  पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. 
त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 32 लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ उडाली आहे.   महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत ३२ नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती मिळाली. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने उद्या तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. उर्वरीत १८ जणांचा शोध घेत आहोत. त्यांची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. तसेच हे लोक शहरात कधी आले आहेत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Big news! 14 suspected municipalities from Delhi are hospitalized;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.