स्वारगेट अत्याचार पीडितेचं पोलीस आयुक्तांना पत्र; विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:40 IST2025-03-11T21:40:02+5:302025-03-11T21:40:50+5:30

असीम सरोदे यांनी हा खटला माझ्या बाजूने न्यायालयात लढावा अशी इच्छा पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

Big news Appoint Asim Sarode as special public prosecutor Swargate victim demands police | स्वारगेट अत्याचार पीडितेचं पोलीस आयुक्तांना पत्र; विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची मागणी?

स्वारगेट अत्याचार पीडितेचं पोलीस आयुक्तांना पत्र; विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची मागणी?

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे |

Pune Rape Case: स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणातील पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणात ॲड. असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी पीडितेने या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. या मागणीला आता पोलीस आयुक्तांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या हेतूने राज्य सरकारकडून सदर केसमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणेपोलिसांकडून यासाठी वकिलांचे नाव राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहे. असीम सरोदे यांनी हा खटला माझ्या बाजूने न्यायालयात लढावा अशी इच्छा पीडित तरुणीने पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुणे पोलीस आता या प्रकरणी राज्य सरकारकडे कोणाच्या नावाची शिफारस करतात, हे पाहावे लागेल.

गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याची तयारी

पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडे याच्याविरुद्ध तांत्रिक, तसेच वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ज्या बसमध्ये त्याने बलात्कार केला, ती संबंधित बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ताब्यात घेतली आहे. गाडे याने त्याचा मोबाईल फेकून दिला आहे. मोबाईल जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचे मोबाईल संभाषण, तसेच त्याअनुषंगाने तांत्रिक तपास करण्यात येत आहे. त्याच तपासात गाडे स्वारगेट बरोबरच इतर बस स्थानकांत फिरत असल्याचे समोर आले आहे. एकंदर मिळालेली माहिती पाहता, गाडे याने आपल्या गुन्हेगारी कृत्यासाठी बस स्थानके हेरून ठेवली होती. जशी संधी मिळेल, तशी तो गुन्हेगारी कृत्य करत होता, असे दिसून येते.  

Web Title: Big news Appoint Asim Sarode as special public prosecutor Swargate victim demands police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.