निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:19 PM2024-03-14T17:19:49+5:302024-03-14T17:50:53+5:30
आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली.
मुंबई/पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एक आमदार आणि एका माजी नगरसेवकाचा प्रवेश होत असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्याहस्ते निलेश लंकेंच्या कोविड या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्याहस्ते झाले असून निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेवरच मी चालतो, असे म्हटले. मात्र, शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याचं स्पष्टपणे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे, लंकेचं नेमकं काय चाललंय, असा प्रश्न कायम आहे. राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयात निलेश लंके पोहोचले होते, तर वसंत मोरे यांनीही नुकतेच शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निलेश लंकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लंकेंचा निर्धार पक्का असून ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असे समजते.
आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली. त्यांनी महायुतीमधील मंत्रीमहोदयांबाबत तक्रार केली. त्यासाठी लवकरच लंके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपण बैठक घेणार आहे. यावेळी संबंधित मंत्रीमहोदयांना देखील बोलावून त्यांच्यात आपसात झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे चुकीचे काही न करण्याबाबत लंके यांना सूचित केले आहे. आता ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांना आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना पक्षाचा व्हीप लागू झाला आहे. त्यांना वेगळी भूमिका घ्यायची झाल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन करावे लागेल, अशी सध्याची परिस्थिती असल्याचं अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. मात्र, निलेश लंकेंनी शरद पवार यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली.
वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाली असून वसंत मोरेंचं अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही. पण, ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, आज निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही पुण्यातील कार्यालयात शरद पवारांसोबत होते. त्यापैकी, निलेश लंकेंनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता, अहमदनगरमधून ते आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.