मोठी बातमी! दीड वर्षे गुंगारा देणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक; स्वत:हून पुणे पोलिसांना आला शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 04:20 PM2021-07-06T16:20:05+5:302021-07-06T20:49:26+5:30

विविध गुन्ह्यात रवींद्र बर्‍हाटेचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. 

Big News : Right to Information Activist Ravindra Barhate was arrested; He surrendered to Pune police | मोठी बातमी! दीड वर्षे गुंगारा देणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक; स्वत:हून पुणे पोलिसांना आला शरण

मोठी बातमी! दीड वर्षे गुंगारा देणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक; स्वत:हून पुणे पोलिसांना आला शरण

googlenewsNext

पुणे : जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे हा आज दुपारी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत स्वत: हून शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रवींद्र बर्‍हाटे याच्या शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. 

नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर बर्‍हाटे यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अ‍ॅड. सुनिल मोरे यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर आज रवींद्र बर्‍हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बर्‍हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरु होते.  रवींद्र बर्‍हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.

बर्‍हाटे गुजरात, कर्नाटकासह विविध जिल्ह्यात होता लपून
रवींद्र बर्‍हाटे हा गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या काळात तो विविध राज्यात लपून छपून रहात असल्याचे पुढे आले आहे.  पुण्यातून तो पळून जाताना मावळ तालुक्यातील एकाची दुचाकी घेऊन पसार झाला होता. त्यानंतर पुणे परिसरात काही काळ लपून बसला होता. त्यानंतर तो सोलापूर, सातारा या भागात काही ओळखीच्या लोकांकडे राहिला. त्यानंतर तो गुजरात, हैद्राबाद, कर्नाटक या राज्यात गपचूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आज पोलीस आयुक्तालयात आल्यानंतर तो तणावाखाली दिसून आला. त्याला चालतानाही त्रास होत असल्याचे जाणवत होते. पोलीस उद्या त्याला न्यायालयात हजर करणार आहेत.

Web Title: Big News : Right to Information Activist Ravindra Barhate was arrested; He surrendered to Pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.