मोठी बातमी ! UPSC ने Pooja Khedkar ला ठरवलं दोषी; भविष्यात आयोगाची कुठलीही परीक्षा देता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 03:44 PM2024-07-31T15:44:35+5:302024-07-31T15:46:40+5:30

Pooja Khedkar News युपीएससीने पूजा खेडकर यांच्याबाबत मोठा निर्णय दिला आहे.

Big news UPSC convicts Pooja Khedkar Candidature cancelled | मोठी बातमी ! UPSC ने Pooja Khedkar ला ठरवलं दोषी; भविष्यात आयोगाची कुठलीही परीक्षा देता येणार नाही

मोठी बातमी ! UPSC ने Pooja Khedkar ला ठरवलं दोषी; भविष्यात आयोगाची कुठलीही परीक्षा देता येणार नाही

आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) बाबत युपीएससीने मोठा निर्णय दिला आहे. पूजा खेडकरला युपीएससीने दोषी ठरवलं आहे, युपीएससीने खेडकरची उमेदवारीही रद्द केली आहे. 

महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) सध्या चर्चेत आल्या होत्या. पूजा खेडकरने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे समोर आले आहे.  पूजा खेडकरने सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी केली. नियुक्तीदरम्यान खेडकरने फक्त ओबीसी किंवा अपंगत्व प्रमाणपत्रच नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र देखील सादर केले होते.  या प्रमाणपत्रांची पडताळणी न करता त्यांची नियुक्ती कशी झाली, याचा तपास सध्या सुरू आहे. यासोबतच पूजाला व्हेरिफिकेशनसाठी अनेकवेळा बोलावूनही ती हजर झाली नाही, याचीही चौकशी सुरू आहे.

युपीएससीने कारवाई का केली?

आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं रद्द केली. अपंग तसेच उत्पन्नाबाबत जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये युपीएससीला अनियमितता आढळली आहे, यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आता खेडकरला युपीएससीची कुठलीही परीक्षा देता येणार नाही. 

पूजा खेडकर यांना स्पष्टीकरण देण्यास पुरेसा अवधी देऊनही त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले नाही. तसेच खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासून आणि इतर माहिती पडताळून सीएसई २०२२ नियमांचे उललंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे यूपीएससीने म्हंटले आहे. यामुळे त्यांची परिविक्षाधीन निवड रद्द केल्याचे पत्रक यूपीएससीने काढले आहे.

पूजा खेडकर चर्चेत कधी आली?

IAS पूजा खेडकर नुकत्याच चर्चेत आल्या आहेत. युपीएससी पास केल्यानंतर सुरुवातीचे प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली झाली. पूजा खेडकरने पुण्यात स्वतंत्र केबिन आणि कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. याशिवाय, खेडकरने आपल्या खासगी ऑडी वाहनावर महाराष्ट्र सरकार लिहून, त्यावर अंबर दीवाही लावला होता. यावरुन वाद निर्माण झाला होता. 

पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीची तक्रार करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर नॉट रिचेबल होत्या.  पुणे पोलिसांनी दोनवेळा समन्स देऊनही खेडकर आयुक्तालयात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिली नाही. याबाबत पुणे पोलिसांनी खेडकरसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पूजा खेडकरविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने नॉट रिचेबल असल्याची चर्चा पोलिस दलात होती.

खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट?

 पूजा खेडकरच्या आई-वडिलांनी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राज्य सरकारकडे खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झाला आहे का? याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Big news UPSC convicts Pooja Khedkar Candidature cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.