खंडाळ्यात लोणावळा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६८ हजारांचा दारूसाठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 19:35 IST2022-12-31T19:32:02+5:302022-12-31T19:35:02+5:30
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये ही कारवाई करण्यात आली...

खंडाळ्यात लोणावळा शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६८ हजारांचा दारूसाठा जप्त
लोणावळा (पुणे) : खंडाळा शिवाजी पेठ येथे अवैधरीत्या देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करत त्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर लोणावळा शहर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कारवाई करत त्याच्याकडील तब्बल ६८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये ही कारवाई करण्यात आली.
खंडाळा पोलिस चौकीला नेमणुकीस असलेले लोणावळा शहरचे पोलिस हवालदार मयूर अबनावे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, अजय रामचंद्र जांभूळकर (वय ५६, रा. शिवाजी पेठ, खंडाळा) याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. जांभूळकर यांच्याकडे ५२ प्रकारच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. त्या सर्वांची किंमत ही ६८ हजार २२० रुपये असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.