भावी गुरुजींना मोठा दिलासा; पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 05:55 AM2024-02-09T05:55:55+5:302024-02-09T05:56:21+5:30

पवित्र पाेर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे उमेदवार झाले होते हैराण

Big relief to the future Guruji; Extension of time for giving preference | भावी गुरुजींना मोठा दिलासा; पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ

भावी गुरुजींना मोठा दिलासा; पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ

लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पसंतीक्रम देण्याची मुदत अखेर १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढऱे यांनी गुरुवारी रात्री ही माहिती दिली.

पवित्र पोर्टलवर माहिती भरताना   मागील दाेन दिवसांपासून उमेदवारांना तांत्रिक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. लॉगिन न होणे, प्रेफरन्स असाईन करीत असताना पोर्टलच बंद पडणे आदी कारणांमुळे उमेदवार हैराण झाले होते. पसंतीक्रम देण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करणारे हजारो मेलदेखील शिक्षण आयुक्तालयाला मिळाले होते.   पवित्र पोर्टलवर उमेदवारांना साेमवारपासून (दि. ५) प्राधान्यक्रम जनरेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ६ आणि ७ फेब्रुवारी राेजी प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि त्यानंतर ८ आणि ९ फेब्रुवारी राेजी प्राधान्यक्रम लाॅक करावेत, असे सांगण्यात आले होते. आता ही मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत असेल. लॉगिन न होणे, मध्येच पोर्टलच बंद पडणे आदी कारणांमुळे उमेदवार हैराण झाले आहेत. 

प्राधान्यक्रम भरताना अनेक उमेदवार गोंधळून गेले आहेत आणि त्यात पाेर्टल व्यवस्थित चालत नाही. नियम बदलाचा फटका अनेक उमेदवारांना बसल्यामुळे फॉर्म भरताना एरर येत आहे. प्रशासनाने शिक्षण आयुक्त कार्यालयात मदत केंद्र सुरू करावे 
- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डीटीएड्.,
बी. एड्. स्टुडंट असोसिएशन

अर्ज भरण्याच्या मागणीस मुदतवाढ दिली आहे. याबाबत आलेल्या सूचनांची दखल घेऊन हा निर्णय घेतल्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले.

ई-मेलवर तक्रारींचा पाऊस 
nउमेदवारांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्व-प्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
nप्राप्त ई-मेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. ई-मेलची संख्या पाहता उत्तरे प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतीक्षा करावी, असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

मंगळवारपर्यंत ५७००० उमेदवारांची नोंदणी
पवित्र पाेर्टलवर गेल्या साेमवारी रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आठ हजार जणांनी प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते.
त्यानंतर मंगळवारी रात्री ८:०० पर्यंत ५७ हजार उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते. बुधवारपासून पाेर्टलवर तांत्रिक अडचण येण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले.
शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी दुपारी अचानकपणे  ४:०० ते ६:०० या कालावधीत देखभाल दुरुस्तीसाठी पवित्र पाेर्टल बंद ठेवले हाेते.
मात्र, त्यानंतरही प्राधान्यक्रम भरण्यास अडचणी येतच आहेत. ८  फेब्रुवारीपासून  प्राधान्यक्रम लाॅक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार हाेती.
मात्र, सायंकाळपर्यंत ही सुविधा सुरू झाली नाही. गुरुवारी सायंकाळी तर पाेर्टल ठप्प पडल्याचेही अनेक उमेदवारांनी सांगितले.   

१,६३,०००
टेट- २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रमाणित करून घेतले आहे. 

५७.०००
उमेदवारांनी  मंगळवारी रात्री ८:०० पर्यंत प्राधान्यक्रम जनरेट केले हाेते.  

Web Title: Big relief to the future Guruji; Extension of time for giving preference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.