जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:29 PM2024-10-22T15:29:50+5:302024-10-22T15:32:44+5:30

शरद पवारांकडून पक्षातीलच निष्ठावंत उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे आणि मोहित ढमाले यांचे नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

Big twist again in Junnar congress satyashil Sherkars entry opposed by sharad pawar ncp 2 loyalists in the candidacy race | जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!

जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!

Junnar Vidhan Sabha ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली असली काही मतदारसंघांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. जुन्नरमध्येही अशीच स्थिती असून मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनच लढण्याचे निश्चित केले असले तरी त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर नेमके कोण लढणार, याबाबतचा सस्पेन्स अद्यापही काय आहे. अशातच जुन्नरचा तिढा सोडवण्यासाठी आता थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असून पवार यांच्यासह अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत जुन्नरच्या उमेदवारीबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध दर्शवल्याचे समजते. हा विरोध लक्षात घेत आता पवारांकडून पक्षातीलच निष्ठावंत उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे आणि मोहित ढमाले यांचे नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जुन्नर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला तर विद्यमान आमदार अतुल बेनके हेच तुतारीवर लढतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र बेनके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेतल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यानंतर आता सध्या काँग्रेसमध्ये असलेले सत्यशील शेरकर हे तुतारीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र शेरकर यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप एकमताने सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आता पक्षातीलच निष्ठावंताच्या हाती तुतारी दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात शरद लेंडे आणि मोहिते ढमाले हे दोन माजी जिल्हा परिषद सदस्य उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यातील शरद लेंडे हे अनुभवी असून त्यांनी माजी आमदार दिवंगत वल्लभ बेनके यांच्यासोबतही काम केलं आहे. तर दुसरीकडे, मोहित ढमाले यांनी  जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगली कामगिरी करत तरुणांसह तालुक्यातील विविध घटकांशी संपर्क ठेवला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की शरद पवार ऐनवेळी आणखी कोणाच्या नावाला पसंती देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Big twist again in Junnar congress satyashil Sherkars entry opposed by sharad pawar ncp 2 loyalists in the candidacy race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.