भडकवण्याचे काम लेखकाचे नव्हे - बिजेंद्र पाल सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:16 AM2019-03-20T01:16:12+5:302019-03-20T01:17:46+5:30

‘‘लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे.

 Bijender Pal Singh | भडकवण्याचे काम लेखकाचे नव्हे - बिजेंद्र पाल सिंग

भडकवण्याचे काम लेखकाचे नव्हे - बिजेंद्र पाल सिंग

Next

पुणे  - ‘‘लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे. त्याच्या शब्दांनी जग बदलू शकते, अशा शब्दातं एफटीआयआयचे अध्यक्ष बिजेंद्र पाल सिंग यांनी लेखकांचे महत्व विशद केले.

तब्बल २२ वर्षांनी फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) संस्थेमध्ये पदवी प्रदान समारंभ पार पडला. अंगात केशरी गाऊन, डोक्यावर पुणेरी पगडी...मान्यवरांच्या हस्ते प्रथमच प्रमाणपत्र घेण्याचा अनुभव... विद्यार्थ्यांचे खुललेले चेहरे अशा भारावलेल्या वातावरणात हा पदवीप्रदान सोहळा रंगला. बिजेंद्र पाल सिंग यांच्या हस्ते टिव्ही विभागातील २०१४-२०१५, २०१५-२०१६ आणि २०१७-२०१८ या बँचमधले पदव्युत्तर विद्यार्थी तसेच चित्रपट विभागातील पटकथा लेखन अभ्यासक्रमाच्या २०१६-२०१७ आणि २०१७ -२०१८ बँचच्या अशा एकूण १४८ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

याप्रसंगी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव वरूण भारद्वाज, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आणि टिव्ही विभागाचे अधिष्ठाता आर एन पाठक उपस्थित होते.

’सीआयडी’ मालिकेचे तब्बल १९ वर्षे लेखन करणारे बिजेंद्र पाल सिंग म्हणाले, लेखकांच्या लेखणीमध्येच समाज बदलाचे सामर्थ्य आहे. आज टिव्ही आणि चित्रपट माध्यम बदलले आहे. व्यावसायिक आणि अव्यावसायिक ही दरी कमी झाली आहे. वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट किंवा मालिका बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरत आहेत. हे लेखकांमुळेच शक्य झाले आहे. एखादी मालिका यशस्वी झाली की लेखकांची जबाबदारी वाढते. दुस-याची दु:ख समजण्याची ताकद नसेल तर लेखन क्षेत्रात पुढे जाता येणे शक्य नाही. मी अनेक वर्षे सीआयडी लिहीत होतो. तुम्हाला कंटाळा आला नाही का? असे सातत्याने विचारले जायचे. पण मी जबाबदारी समजून लेखन केले. विविध अभ्यासक्रमांची भूपेंद्र कँथोला यांनी माहिती दिली.

मी मूळचा नगर जिल्ह्यातील आहे. त्या भागात एफटीआयआय संस्था आणि अशा प्रकारचे शिक्षण याबद्दल काहीच माहिती नाही. एफटीआयआयमध्ये जे तंत्रशुद्ध शिक्षण मिळते तसे कुठेच दिले जात नाही.
- ओंकार परदेशी,
विद्यार्थी, टिव्ही एडिटिंग

पदवी प्रदान सोहळा हा आमच्यासाठी आनंददायी अनुभव होता. आज आमचे करियर ख-या अर्थाने सुरू झाले आहे.
- शताब्दी रॉय,
विद्यार्थी व्हिडिओ एडिटिंग

मनोरंजन क्षेत्राला कायमच लेखकांची निकड...

भारत हा प्रकर्षाने बदलत आहे. त्यामुळे लेखकांना आपण कुणासाठी लिहीत होतो, कुणासाठी लिहायचे आहे हे समजावे लागेल. भाषेत बदल करावा लागेल असा कानमंत्रही त्यांनी विद्याथर््यांना दिला.
जगभरात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. जे आज शिकलो ते भविष्यात उपयोगी पडेलच असे नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत जाणार आहे. पण लेखक आणि दिग्दर्शन क्षेत्राला याचा फटका बसणार नाही. मनोरंजन क्षेत्रात लेखकांची कायमच निकड भासणार आहे. लेखकांची मागणी खूप आहे.
हवा तेवढा पुरवठा होत नाही, अशी सध्याची मनोरंजनाची स्थिती आहे. त्यामुळे दिग्दर्शक, निर्माता लेखकांवर अवलंबून आहेत. ते येतील आणि नवीन कल्पना सुचवतील. यासाठी लेखकांनी वाचन, निरीक्षण आणि ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे पाल म्हणाले.

Web Title:  Bijender Pal Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.