पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी चालकास लुटले; मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून १ लाख घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2023 05:16 PM2023-02-26T17:16:04+5:302023-02-26T17:16:26+5:30
दोन मोटार सायकलवरील ६ चोरट्यांनी दरोडा टाकण्याचे हेतूने दुचाकीस्वाराला थांबविले
राजगुरुनगर: पुणे -नाशिक महामार्गावर खेड घाटात दुचाकीस्वाराला बंदूकीचा धाक दाखवून मारहाण करून सुमारे सव्वा लाख रुपये लुटल्याची घटना (दि. २५ रोजी )रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. किरण सुनिल गुंजाळ (रा. साई हौसींग सोसायटी, आकुर्डी, पुणे. मुळ रा. बेल्हे, ता. जुन्नर ) यांनी अज्ञात चोरट्या विरूध्द खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ नवनाथ विकास गुंजाळ हे दोघे पुणे -नाशिक महामार्गावर वरून वेहेळदरा गावाच्या हद्दीतून खेड घाटमार्गे पुणेवरून बेल्हे येथे जात दुचाकीवर जात होते. त्यांच्या पाठीमागुन आलेल्या दोन मोटार सायकलवरील ६ चोरट्यांनी दरोडा टाकण्याचे हेतूने त्यांची मोटार सायकल आडवी करून थांबविले. तुम्ही आम्हाला कट का मारला असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. कोयत्याने उलट बाजुने मारहाण केली. एकाने बंदुक सदृश हत्यारामधुन एक मिसफायर करून फिर्यादीला धमकावले. रस्त्याच्या बाजुला नेऊन खिष्यातील सातशे रुपये, बँकेचे ९८ हजार रुपये युपीआय द्वारे व नवनाथ गुंजाळ यांची १० हजार रूपये गुगलपेद्वारे, विविध बॅकेचे एटीएम कार्ड, घड्याळ, मोबाईल बळजबरीने काढून घेतले. असा एक लाख बत्तीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लुटला. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट करीत आहे.