दुचाकीचोरांना सापळा रचून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 AM2021-02-24T04:12:01+5:302021-02-24T04:12:01+5:30
पुणे : दुचाकी चोरणाऱ्या तीन राजस्थानी आरोपींना चंदननगर पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ ...
पुणे : दुचाकी चोरणाऱ्या तीन राजस्थानी आरोपींना चंदननगर पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ लाख ६२ हजार रुपये किमतीची वाहने ताब्यात घेण्यात आली.
खियाराम लालाराम मेघवाल (२३, रा. राजस्थान, सध्या थिटे वस्ती, काळूबाईनगर), चुनाराम लालाराम मेघवाल (२१, रा. खराडी), दिलखुश कुंभाराम ठीगला (१९, रा. खराडी) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने चंदननगर पोलीस ठाण्याचे पथक गुन्हेगारांचा माग काढत होते. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस नाईक तुषार भिवरकर, अमित कांबळे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे हे या भागात गस्त घालत असताना त्यांच्या खबऱ्यामार्फत वाहन चोरी करणारे तीन आरोपी एमएच ०४, जे ए ९५०३ या क्रमांकाच्या दुचाकीने टेम्पो चौकमार्गे वडगावशेरी गावठाणाकडे जाणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली.