मीटर नसतांनाही दिले ५० हजारांचे बील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:28+5:302021-05-30T04:10:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका संतोषनगर (ता. खेड) येथील एका शेतकऱ्याला बसला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका संतोषनगर (ता. खेड) येथील एका शेतकऱ्याला बसला आहे. शेतीपंपला वीज जोडणी न देताही पन्नास हजार रुपयांचे लाईट बिल महावितरणने दिले आहे. विशेष म्हणजे कागदी वीज बिल पन्नास हजार रुपयांचे आहे. तर मोबाईलवर एसएसएमद्वारे ९९ हजार रुपये लाईट बिल पाठवले असल्याने संबधित शेतकऱ्याने न्याय देण्याची मागणी केली आहे.
चाकण वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने हजारो ग्राहक त्रस्त झाले असताना. संतोषनगर, भाम ( ता.खेड) येथील शेतकरी शंकर नामदेव कड यांनी शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी वीजपंप जोडणी मिळविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी रीतसर अर्ज केला होता. परंतु एलपीजी गॅसलाईन काम सुरू असल्याने मागील एक वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष वीज जोडणी देण्यात आली नाही.
शेतीपंपाला वीज वितरण कंपनीकडून जोडणी भेटली नसल्याने शेतीला एक यूनिट देखील वीज वापर झाला नाही. कारण तीन वर्षापासून शेतीपंप विद्युत जोडणी व मीटर बसवलाच नाही. परंतु त्याचे बील मात्र ५१ हजार रूपये वीज बिल कड यांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष वीज बिल ५१ हजार व एसएमएसद्वारे ९९ हजार रुपये वीज बिल देण्यात आले आहे. किमान शेतीपंप विद्युत जोडणी तरी द्या म्हणजे बील येईल आणि ते भरण्यास आमची हरकत नाही, असे मत संबधित शेतकऱ्याने व्यक्त केले.
* फोटो - वीज बिलाचा फोटो.