BIMSTEC राष्ट्रांचे पुण्यात संयुक्त लष्करी सराव 'Panex 21' चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 07:41 PM2021-12-21T19:41:41+5:302021-12-21T19:44:39+5:30
BIMSTEC राष्ट्रांचे संयुक्त लष्करी सराव Panex 21 चे आयोजन पुण्यात करण्यात आले असून मंगळवारी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) सरावाची पाहणी करताना रक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते
पुणे: पुण्यात बिमस्टेक राष्ट्रांचा संयुक्त लष्करी सराव पार पडला. कोरोनाविरुद्ध लढताना येणाऱ्या आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी पॅनेक्स २१ (Panex 21) हा संयुक्त लष्करी सराव (Army Training) झाला. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, हा सराव याकाळात अत्यंत महत्त्वाचा आहे. बिमस्टेक (BIMSTEC Nations) देशांमध्ये एकात्मता, संस्कृतीचे आदानप्रदान त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी कशा पद्धतीने समन्वय स्थापित करावे यासाठी असा सराव गरजेचा आहे.
BIMSTEC राष्ट्रांचे संयुक्त लष्करी सराव Panex 21 चे आयोजन पुण्यात करण्यात आले असून मंगळवारी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) सरावाची पाहणी करताना रक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी देशाचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, तसेच भूतान, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, बांगलादेश आणि थायलंड या बिमस्टेक राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सरावात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या बचाव आणि मदत पथकाने सराव केला. आपत्ती परिस्थितीत लोकांचे सुरक्षित जागेत स्थलांतरण कशा पद्धतीने करावे याचे प्रत्यक्ष सादरीकरण या सरावादरम्यान केले गेले.
Speaking at PANEX-21 in Pune. https://t.co/7FJYDsWXN2
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 21, 2021
या प्रसंगी राजनाथ सिंह म्हणाले, " यापूर्वी अनेक नैसर्गिक आपत्त्या उद्भवल्या आहेत. त्यावेळी प्रचंड नुकसान आणि जीवितहानी देखील झाल्या होत्या. त्या परिस्थितीत भारत व इतर मित्र देश एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आले. नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या राष्ट्राला आपत्तीचा सामना करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या परिस्थितीमध्ये मित्र देशांच्या एकत्रित प्रयत्न संसाधने एकत्र करणे आणि मदत उपायांचे आयोजन करण्यात शक्ती गुणक म्हणून काम करेल. यामुळे लोकांनाही मोठा दिलासा मिळेल.