‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युद्धसराव सुरू; नेपाळकडून माघार; पाचच देशांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 04:49 AM2018-09-11T04:49:32+5:302018-09-11T04:49:42+5:30

बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स १८ हा पहिला लष्करी युद्धसराव घेण्यात येत आहे.

BIMSTEC launches first military war; Nepal withdraws Participation of five countries | ‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युद्धसराव सुरू; नेपाळकडून माघार; पाचच देशांचा सहभाग

‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युद्धसराव सुरू; नेपाळकडून माघार; पाचच देशांचा सहभाग

Next

पुणे : बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स १८ हा पहिला लष्करी युद्धसराव घेण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी औंध येथील मिलिटरी स्टेशनवर मराठा लाइट इंन्फ्रटीचे प्रमुख मेजर जनरल संजीव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाला. नेपाळने सरावात सहभागी न होण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला.
सदस्य राष्ट्रांच्या लष्करी तुकड्यांचा सहभाग असलेल्या संचलनाचे नेतृत्व गोरखा बटालियनच्या गौरव शर्मा यांनी केले. पुढील सहा दिवस हा सराव असणार आहे. याप्रसंगी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आदी उपस्थित राहणार आहेत.
>नेपाळचा सहभाग नसल्याने अनेक तर्कवितर्क
बिम्सटेकच्या स्थापनेवेळी लष्करी सरावाचा करार झाला नव्हता. त्यामुळे यात सहभागी होऊ शकत नाही, असे नेपाळकडून सांगण्यात आले आहे. सरावात त्यांचे अधिकारी निरीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. नेपाळच्या या भूमिकेमागे चीनचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: BIMSTEC launches first military war; Nepal withdraws Participation of five countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.