Purushottam Karandak 2022: विद्यार्थ्यांनी लसीचा एकच डोस घेतला असल्यास 'RTPCR' बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 02:50 PM2021-12-30T14:50:14+5:302021-12-30T14:50:23+5:30

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, एक डोस घेतला असल्यास आरटीपीसीआरचा रिपोर्ट महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे.

Binding if students have taken one dose of the vaccine rtpcr compulsory in purushottam karandak pune | Purushottam Karandak 2022: विद्यार्थ्यांनी लसीचा एकच डोस घेतला असल्यास 'RTPCR' बंधनकारक

Purushottam Karandak 2022: विद्यार्थ्यांनी लसीचा एकच डोस घेतला असल्यास 'RTPCR' बंधनकारक

Next

पुणे : ‘अरे आव्वाज कुणाचा’...या आरोळ्या भरत नाट्य मंदिरामध्ये घुमणार आहेत. येत्या ३ जानेवारीपासून ‘पुरुषोत्तम’ करंडक स्पर्धेचा जल्लोष सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तालमीही सुरू झाल्या आहेत. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेमध्ये शासकीय नियमांचे कडक पालन केले जाणार असून स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या संघातील विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, एक डोस घेतला असल्यास आरटीपीसीआरचा रिपोर्ट महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलाजीवनाचा अविभाज्य घटक असलेली पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यंदा होणार आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत महाविद्यालये आणि नाट्यगृह खुली झाल्याने ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने घेतला आहे. त्यानुसार येत्या ३ जानेवारीपासून स्पर्धेच्या पहिल्या फेरीला प्रारंभ होणार आहे. ओमायक्रॉनचे सावट स्पर्धेवर असले तरी आयोजकांनी स्पर्धा रद्द करणे किंवा पुढे ढकलण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु शासनाच्या कोरोना नियमांचे स्पर्धेमध्ये काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दरवर्षी ५१ संघ सहभागी होतात. परंतु एका संघाने प्रवेश रद्द केल्याने आता ५० संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा ‘डबल’ धमाका म्हणजे ही स्पर्धा जानेवारी आणि नेहमीप्रमाणे ऑगस्टमध्येही घेतली जाणार आहे.

यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धा पार पडली. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात राज्यस्तरीय पुरुषोत्तम महाकरंडक स्पर्धा झाली. करोनामुळे गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आणि या जानेवारीत स्पर्धा घेता आली नाही. संस्थेने महाकरंडक स्पर्धेचा विचार अजून केलेला नसल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

''पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतर्गत तारीख १ ते १७ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. ६३ एकांकिकांसाठी भरत नाट्य मंदिरचे बुकिंग करण्यात आले होते. प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे ५० संघानीच प्रवेश निश्चित केला. त्यामुळे ३ जानेवारीपासून स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे मंगेश शिंदे यांनी सांगितले.''  

Web Title: Binding if students have taken one dose of the vaccine rtpcr compulsory in purushottam karandak pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.