स्वत:च कर्तृत्व झळकविण्यासाठी डोकवावा असा ‘बायोस्कोप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:13+5:302021-05-16T04:11:13+5:30

‘अमिताभ आख्यान’ या पहिल्या भागात लेखकानं चित्रपटांचा आपल्यावर असणारा प्रभाव आणि त्यातून आपण कसं घडतो याचा प्रत्यक्ष अनुभव सांगितला ...

A 'Bioscope' to look at yourself | स्वत:च कर्तृत्व झळकविण्यासाठी डोकवावा असा ‘बायोस्कोप’

स्वत:च कर्तृत्व झळकविण्यासाठी डोकवावा असा ‘बायोस्कोप’

Next

‘अमिताभ आख्यान’ या पहिल्या भागात लेखकानं चित्रपटांचा आपल्यावर असणारा प्रभाव आणि त्यातून आपण कसं घडतो याचा प्रत्यक्ष अनुभव सांगितला आहे. त्यानंतर एक स्नेहबंधाची कहाणी, संगंधीत ते आदरावे अशा अनेक वेधक मथळ्यांतून लेखकानं आयुष्यातील उत्तम शिक्षा देणाऱ्या घटनांचा ऊहापोह केला आहे. वीरप्पन विरुध्द ‌विजयकुमार, ग्यानबाची एचार्डी, महाराष्ट्रातील संरक्षित प्रदेशांचे अभ्यास विश्लेषण, घाटमाथासारख्या भागामध्ये लेखनानं त्यांच्या वाचनात आलेल्या पुस्तकातून उत्तम जगण्यासाठी कशी उर्मी मिळते आणि पुस्ताकांचे गम सांगितले आहेत. याशिवाय शिवरायांच्या कर्नाटक स्वारीचे महत्त्वापासून ते शिवरायांचे कृषी धोरण, राज्यातील व्यवसायवृध्दीचे धोरण आदी गोष्टीही त्यांनी इतिहासाच्या पानात जाऊन उत्तम पध्दतीने मांडल्या आहेत.

एकाच विषयाला वाहिलेलं अवघे पुस्तक वाचताना ज्यांना कंटाळा येतो किंवा त्यामुळे पुस्तक पूर्ण वाचून होत नाही अशा वाचकांसाठी ‘बायोस्कोप’ हे पुस्तक पर्वणीच ठरणार आहे.

Web Title: A 'Bioscope' to look at yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.