बिरदवडीकरांचा कचरा रस्त्यावर; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:34+5:302021-03-10T04:12:34+5:30

वाढत्या औद्योगिकरणाने बिरदवडी येथील फडकेवस्ती, पवारवस्ती, मुळेवस्ती या भागात स्थानिक लोकांसह भाडेकरूही मोठ्या संख्येने राहत आहेत. या वस्त्या चाकण ...

Biradwadikar's garbage on the road; Neglect of Gram Panchayat | बिरदवडीकरांचा कचरा रस्त्यावर; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

बिरदवडीकरांचा कचरा रस्त्यावर; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Next

वाढत्या औद्योगिकरणाने बिरदवडी येथील फडकेवस्ती, पवारवस्ती, मुळेवस्ती या भागात स्थानिक लोकांसह भाडेकरूही मोठ्या संख्येने राहत आहेत. या वस्त्या चाकण -आंबेठाण या रस्त्याच्या शेजारी असून,येथील लोकांचा कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने कचराकुंड्या ठेवल्या नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध नसल्याने कचरा रस्त्याच्या शेजारी टाकला जात आहे. तसेच ग्रामपंचायतीकडूनही हा कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. वस्त्यांच्या शेजारील काही मोकळ्या जागी कचराकुंड्या नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव घनकचरा मोकळ्या जागेत टाकावा लागतो. कित्येक दिवस तो कचरा उचलला जात नाही, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

चाकण-आंबेठाण या मुख्य मार्गालगत टाकण्यात आलेला कचरा वेळेत उचलला जात नाही. कचरा मोठ्या प्रमाणावर साठल्याने कचरा रस्त्यावर आला आहे, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. हवेमुळे कचरा सगळीकडे पांगतो आहे. परिणामी रस्त्यावर कचऱ्याचे ढीगच ढीग साचलेले पाहवयास मिळतात. अशा समस्यांना रोजच तोंड द्यावे लागत असल्याने वाहनचालक तसेच या भागातील नागरिक अक्षरश त्रस्त झाले असून त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्वरित हा कचरा ग्रामपंचायतीने उचलावा अशी मागणी होत आहे.

चाकण- आंबेठाण रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याचे ढीग.

Web Title: Biradwadikar's garbage on the road; Neglect of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.