पक्षी दिन : नदीच्या प्रदूषणामुळे कवडी पक्षीनिरीक्षण स्थळ धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 01:42 AM2018-11-16T01:42:53+5:302018-11-16T01:43:30+5:30

पक्षी दिन : पक्ष्यांच्या वैविध्यामुळे पुण्यातील क्रमांक चारचे पक्षीनिरीक्षण स्थळ, डॉ. सलिम अलींच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम आयोजित

Bird day: Due to the river pollution, the danger of the river bed | पक्षी दिन : नदीच्या प्रदूषणामुळे कवडी पक्षीनिरीक्षण स्थळ धोक्यात

पक्षी दिन : नदीच्या प्रदूषणामुळे कवडी पक्षीनिरीक्षण स्थळ धोक्यात

googlenewsNext

हडपसर : पुणे सोलापूर महामार्गावर कवडी येथे नदीपात्र वाढल्याने व त्यामध्ये वाढत असलेल्या जलपर्णीमुले तसेच या ठिकाणी पडत असलेल्या प्लास्टिक कचऱ्याने पक्षांना अन्न शोधणे कठीण जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे येणाºया पक्षांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या उत्तरेकडून आलेल्या हजारो पाहुण्या पक्ष्यांचे संमेलन भरले आहे. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पुणे शहर व परिसरातील पक्षीवेडे लोक गर्दी करत आहेत.पाहुण्या पक्ष्यांच्या आधीवासाने व त्यांच्या सुमधूर स्वरांनी कवडीचा आसमंत नटला आहे. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने रशिया व तिबेट मधून आलेली रंगीबेरंगी बदकं मध्य आशियातून आलेले शेकाटे व इतर पाणपक्ष्यांचा समावेश आहे. परंतु पूर्वी पेक्षा हे प्रमाण कमी होत आहे. निसर्ग प्रेमींनी हे प्रमाण टिकवूण ठेवण्यासाठी येथील वातावरण निरोगी ठेवणे गरजेचे आहे.
सध्या कवडी येथे स्थलांतरित बदकांमध्ये नॉदर्न शोवेलर (थापट्या), रुड्डी शेल्डक(ब्राह्मणी बदक),कॉमन टील(चक्रांग), गार्गणी(भिवई), रफ (रक्त सुरमा), ब्लॅक विंग्ड स्टिल्ट (शेकाट्या), सेंड पायपर (तुतारी) यूरेशियण मार्श हॅरियर (दलदल हरीण), आयबिस (तीन प्रकारचे शराटी ) पैंटेड स्टोर्क (चित्र बलाक), ऊली नेकेड स्टोर्क(कांडेसर) स्पॉट बिल डक (राखी बदक), दाबचिक, रिव्हर टर्न (नदी सुरय), ग्रे हेरॉन(राखी बगळा), पर्पल हेरॉन (जांभळा बगळा), पौंड हेरॉन(वंचक), किंगफिशर (तीन प्रकारचे धीवर), स्वालो (भिंगरी), वॅगटेल्स (तीन प्रकारचे धोबी), पीपीट्स (तिर चिमणी), चाट (गप्पीदास) इत्यादी पाणपक्षी तर नदीकाठी बाभूळ वनात हिंडताना स्थलांतरित वटवटे, रेड थ्रोटेड वरब्लर (तांबोला), कोकीळ, मॅग पाय रॉबिन (दयाळ), हळद्या, मैना, सुभग, कोतवाल, बुलबुल, इत्यादी पक्ष्यांची समूह गीते कानावर येऊन मन मोहून जाते.

निसर्गयात्री या संस्थेचे संचालक पक्षी अभ्यासक विशाल तोरडे म्हणाले की" हिवाळा सुरू होताच उत्तर गोलार्धात बर्फ वृष्टी होऊन नद्या, जलाशय, सरोवरे गोठतात, जमीन बफार्छादित होऊन अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. शिवाय थंडी वाढते. दिवस लहान व रात्र मोठी असल्यामुळे अन्न मिळवण्यासाठी पक्ष्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे अन्न मिळवणे व थंडीपासून संरक्षण करणे यासाठी उत्तरेकडील पक्षी लाखोंच्या संख्येने दक्षिणेकडे प्रयाण करतात. या प्रवासात पक्ष्यांना ग्रह नक्षत्रांचा मार्गदर्शक खुणा म्हणून उपयोग होतो, तसेच पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, ध्वनी लहरी, पर्वत इत्यादींचाही मार्गक्रमण करण्यासाठी उपयोग होतो.
असे स्थलांतरित पक्षी पुण्याच्या परिसरात पाहायला मिळतात त्यामध्ये कवडीचाही समावेश आहे.पक्षी अभ्यास, व त्यांच्या अधिवसांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी स्थानिक प्रयत्न करत आहोत. लोकांच्या मनात पक्षी व निसर्गाबद्दल प्रेम व जागृती निर्माण करण्यासाठी विविध निसर्ग विषयक उपक्रम राबवत आहोत.

रविवारी स्वच्छता मोहिम
पावसाळ्यामुळे पुणे शहरातून आलेला कचरा कवडीपाट येथील पुलाला अडकला आहे. त्यामुळे येथील सौंदर्य नष्ट होत आहे. येतील कचरा काढण्यासाठी गेल्या तीन-चार रविवारी स्वच्छ भारत स्वच्छ पुणे तर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. कॅप्टन पुनीत शर्मा हे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांना पर्यावरणप्रेमी मदत करीत आहेत. येत्या रविवारी (दि.१८) सकाळी ७ वाजता येथे स्वच्छता होईल.

निसर्ग यात्री तर्फे पक्षी दिन साजरा
४१२ नोव्हेंबर हा भारतातील थोर पक्षी तज्ज्ञ डॉ.सलीम अली यांचा जन्मदिन, या दिनाचे औचित्य साधून 'निसर्गयात्री' तर्फे दि.११ नोव्हेंबर रोजी कवडी येथे पक्षी निरीक्षनाचे आयोजन केले होते, यावेळी त्यांनी उपस्थित पक्षीप्रेमींना मार्गदर्शन केले.
 

Web Title: Bird day: Due to the river pollution, the danger of the river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.