बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:26+5:302021-01-13T05:44:47+5:30

मंगळवारी पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. विनायक लिमये यावेळी उपस्थित होते.

Bird flu does not happen to humans - Animal Husbandry Commissioner | बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त 

बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : मुंबई, परभणी, लातूर, बीड आणि ठाणे या जिल्ह्यात आणि उदगीर या तालुक्यातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. मात्र हा आजार पक्ष्यांमधून माणसात संक्रमित होत असल्याचे देशात एकही उदाहरण नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले. राज्यात कोंबड्यांसोबत बगळे, कावळे, पोपट व चिमण्या या पक्ष्यांना बर्ड फ्लूने गाठले असल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. विनायक लिमये यावेळी उपस्थित होते.

Web Title: Bird flu does not happen to humans - Animal Husbandry Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.