‘बर्ड फ्लू’मुळे राज्यात ७ लाखांहून अधिक कोंबड्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:12 AM2021-02-16T04:12:57+5:302021-02-16T04:12:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून मिळून आतापर्यंत पोल्ट्रीतील ७ लाख १२ हजार ...

Bird flu kills more than 7 lakh chickens in state | ‘बर्ड फ्लू’मुळे राज्यात ७ लाखांहून अधिक कोंबड्या नष्ट

‘बर्ड फ्लू’मुळे राज्यात ७ लाखांहून अधिक कोंबड्या नष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून मिळून आतापर्यंत पोल्ट्रीतील ७ लाख १२ हजार १७२ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्याचबरोबर २६ लाख ३ हजार ७२८ अंडीही जमिनीत खोलवर खड्डा करून त्यात पुरण्यात आली. आता साथीला अटकाव झाला असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.

रोगाचा प्रादुर्भाव आढळताच तिथे त्वरित केल्या जात असलेल्या कारवाईमुळेच बर्ड फ्लूची साथ विशिष्ट परिसर ओलांडून सगळीकडे पसरली नसल्याचा पशुसंवर्धन विभागाचा दावा आहे. अकस्मात मरण पावलेल्या कोंबड्यांसह सर्व पक्ष्यांचे नमुने जमा करून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. त्यांच्याकडून होकारार्थी निष्कर्ष मिळाल्यानंतरच लगेचच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नमुना आढळलेल्या ठिकाणच्या १ किलोमीटर परिघातील पोल्ट्रीमधील सर्व कोंबड्या व तेथील पशुखाद्य, अंडी वगैरे नष्ट करतात.

त्यानुसार कोंबड्या व अंडी यासह ७२ हजार ९७४ किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. पोल्ट्रीचालकाला त्याच्या नुकसानीसाठी सरकारी दराने नुकसानभरपाई त्वरित देण्यात आली. राज्य सरकारने त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. ६० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम नुकसानभरपाई आतापर्यंत दिली गेली आहे.

Web Title: Bird flu kills more than 7 lakh chickens in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.