चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 05:03 PM2021-01-16T17:03:00+5:302021-01-16T17:08:21+5:30

संसर्ग झालेल्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या करणार नष्ट

Bird flu outbreak in Pune district; Death of hens in Mulshi taluka | चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू 

चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देसंपूर्ण तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण

पिरंगुट : कोरोना महामारी ने संपूर्ण जगाला वेठीस धरले असताना आता कोरोना बरोबरच बर्ड फ्लू चे ही संकट भारता समोर उभे ठाकले आहे.तेव्हा या बर्ड फ्लू चा शिरकाव हा नुकताच पुणे जिल्ह्यामध्ये झाला असून पुणे जिल्ह्यातील पहिला विषाणू हा मुळशी तालुक्यामधील नांदे येथे नुकताच आढळून आला आहे.येथील काही कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू या विषाणूमुळे झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शिवाजी विधाते यांनी दिली आहे त्यामुळे नांदे परिसरासह संपुर्ण मुळशी तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुळशी तालुक्यातील सुस-नांदे रस्त्यावरती एका खाजगी कुटुंबाने राहत्या घरा लगत घरगुती स्वरूपाचा कोंबडी पालन व्यवसाय सुरु केलेला आहे.तेव्हा काही दिवसांपूर्वी त्यांच्या या छोट्या पोल्ट्रीतील चार ते पाच कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या.परंतु तो प्रकार त्या वरतीच न थांबता त्यांच्या दररोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला.तेव्हा या बाबतीत त्यांना काहीतरी वेगळी शंका वाटू  लागली म्हणून पोल्ट्री मालकाने मागील चार दिवसापूर्वीच आपल्या मृत्य कोंबड्याची तपासणी ही औंध येथील प्रयोगशाळेमधड करून घेतली होती.परंतु दुर्दैवाने त्या तपासणीदरम्यान त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यू च्या विषाणू मुळे झाला नसल्याचा अहवाल त्यांना आला.मात्र तरीही त्या पोल्ट्रीतील कोंबड्या मरण्याचे न थांबता त्यांच्या मरण्याचे प्रमाण हे वाढतच राहिले.तेव्हा मात्र त्या मृत कोंबड्याचे आणखी काही नमुने हे तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले.तर त्याचा अहवाल हा नुकताच रात्री उशिरा आला असून त्यामध्ये  ज्या कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तो मृत्यू हा बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे तेव्हा या आलेल्या या अहवालामुळे संपूर्ण मोशी तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे

 या सर्व घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नांदे येथील संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शिवाजी विधाते म्हणाले की नांदे गावातील शिंदेमळा येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या ठिकाणी जवळपास तीनशे कोंबड्या असून त्या सर्वांची विल्हेवाट लावण्यात येईल याच बरोबर संसर्ग झालेल्या या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या देखील नष्ट केल्या जात आहे.तसेच या परिसरातील दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी विक्री तसेच वाहतूकही तातडीने बंद केली जात आहे.

"नांदे गावातील या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामपंचायतीने तातडीने मदतीची पावली उचलली असून त्यांच्या वतीने जेसीबी व अन्य आवश्यक सामग्री ही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.याविषयी माजी सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितले की, आम्ही नांदेगाव परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना आमच्या वतीने सूचना देण्याचे काम सुरू केले असून.जेसीबीच्या साह्याने तातडीने खड्डा घेऊन संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.

Web Title: Bird flu outbreak in Pune district; Death of hens in Mulshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.