राज्यात तीन जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग; मात्र मानवी संक्रमणाचे उदाहरण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:00 PM2021-01-12T17:00:39+5:302021-01-12T17:01:23+5:30
भीती न बाळगण्याचे पशूसंवर्धन आयुक्तांचे आवाहन
पुणे : राज्यात लातूर, परभणी, ऊदगीर या तीन ठिकाणी कोबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे आढळले आहे. मात्र भारतात हा आजार मानवात संक्रमीत झाल्याचे एकही ऊदाहरण नाही, त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही , असे राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले.
मुंबई, बीड, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी कावळे तर ठाणे, नागपूर इथे बगळे, पोपट, चिमण्या मरण पावल्याचे आढळले आहे, अशी माहिती आयुक्त सिंग यांनी दिली. या सर्व ठिकाणचे नमूने तपासण्यात येत आहे. त्यात ठाणे, बीड, लातूर, परभणी याठिकाणी संसर्ग आढळला आहे असे ते म्हणाले.
कोंबड्यांना आजार झाल्याचे आढळले. त्या ठिकाणचा १० किलोमीटरचा परीघ कोंबड्यांच्या हस्तांतरणासाठी बंद करण्यात आला आहे. त्याच ठिकाणच्या १ किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यात कार्यवाही होत असून संबधित ठिकाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले आहेत.
कोंबड्या किंवा हा आजार असलेल्या पक्ष्यांकडून तो मानवात संक्रमित झाल्याचे भारतात एकही ऊदाहरण नाही. सन २००६ मध्येही बर्ड फ्लू आला होता. त्यावेळी मानवी संक्रमणाची संपूर्ण जगात अगदी मोजकी ऊदाहरणे सापडली. त्यामूळे असे संक्रमण नाहीच असे आयुक्तांंनी सांगितले.