बाळ हिरडा खरेदी सुरु करण्यासाठी बिरसा क्रांती दलाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:19+5:302021-01-25T04:11:19+5:30

कोरोना महामारी मुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे हिरडा खरेदी झाली नाही. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये बाळहिरडा झाडाला येतो. ...

Birsa Kranti Dal agitation to start buying baby hirda | बाळ हिरडा खरेदी सुरु करण्यासाठी बिरसा क्रांती दलाचे आंदोलन

बाळ हिरडा खरेदी सुरु करण्यासाठी बिरसा क्रांती दलाचे आंदोलन

Next

कोरोना महामारी मुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे हिरडा खरेदी झाली नाही. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये बाळहिरडा झाडाला येतो. या महामारीत आदिवासी लोंकानी एप्रिल, मे या दोन महिन्यात बाळहिरडा गोळा केला व घरात साठवून ठेवला आहे. बाळ हिरडा खरेदी बंद असल्याने उपजिवीकेसाठी हातात पैसे राहिले नाहीत. मुलाबाळाची लग्नाचा खर्च, शिक्षणाचा खर्च, कपडेलत्ता खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, जाण्यायेण्याचा खर्च या सर्वांची चनचन भासू लागली आहे. हातावर पोट असल्याने बाळहिरडा हेच आदिवासी लोकांचे महत्वाचे पीक आहे याची तात्काळ खरेदी सुरू करणे गरजेचे आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. हे आदिवासी महामंडळ आदिवासी शेक-यांचा हिरडा, वरई, नाचणी, सावा, खुराचणी ही पिके दरवर्षी खरेदी करते. मात्र दोन वर्षापासून कोणतीही माहिती न देता आदिवासी महामंडळाने बाळ हिरडा खरेदी बंद केल्याने आदिवासी समाजाची नाहक गळचेपी होत आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने तात्काळ आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बाळहिरडा खरेदी सुरू करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, खेड तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, सचिव शशिकांत आढारी, उपाध्यक्ष संतोष भांगे, चिंधू आढळ, अभिजीत लांघी, महेश मराडे, नितीन गवारी, संजय लोंखडे, विष्णू शेळके आदी उपस्थित होते.

२३ घोडेगाव

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेले बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी

Web Title: Birsa Kranti Dal agitation to start buying baby hirda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.