दिशादर्शक फलकांवर वाढदिवसाच्या जाहिराती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:14 AM2018-11-11T02:14:01+5:302018-11-11T02:14:42+5:30
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष : कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या फ्लेक्सबाजीला चांगले उधाण आले असून, वाढदिवस असो की दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ सुरू आहे. यामुळेच शहरात नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवरच थेट वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फ्लेक्स लावतानादेखील भान राहिलेले नाही. शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या व अनधिकृत फ्लेक्स लावणाºयांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स सर्वत्र झळकत आहेत. भावी आमदार म्हणून जागो-जागी मोहोळ यांच्ये फ्लेक्स लावण्यात आले आहेत. परंतु हे फ्लेक्स लावताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची दिशा दर्शविण्यासाठी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवरही सर्रासपणे अनधिकृतपणे जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी मदत करणाºया दिशादर्शक फलकांवरील या आतिक्रमणामुळे दिशाहीन होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या समोरच्याच दिशादर्शक फलकारवरही हा फ्लेक्स टांगलेला आहे. दिवाळीमुळे महापालिकेला सुट्टी असल्यावर शहरात फ्लेक्सला मोकळीक आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करावी
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनीच शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकाºयांना अशा प्रकारे अनधिकृत फ्लेक लावणाºयांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरामध्ये दिवाळीनिमित्त लावण्यात आलेल्या व दिशादर्शक फलकांवर लावलेल्या फ्लेक्सवर संबंधित क्षेत्रीय अधिकारी कारवाई करतील.
अनधिकृत फ्लेक्स असतील तर गुन्हे दाखल करू
शहरामध्ये कोठेही फ्लेक्स, बॅनर लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या सन २००३ च्या नियमावलीनुसार दिशादर्शक फलकावर कोणत्याही परिस्थिती फ्लेक्स लावता येत नाहीत. अशा प्रकारे फ्लेक्स लागले असतील तरी संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील.
- किशोरी शिंदे, घोले रोड क्षेत्रीय अधिकारी