बिटकॉइन प्रकरण : भारद्वाजबंधूंचा बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 06:54 AM2018-06-12T06:54:38+5:302018-06-12T06:54:38+5:30

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून अमित भारद्वाज याने जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले आहेत.

Bitcoin Case: Bharadwaj brother's Flat in Burj Khalifa | बिटकॉइन प्रकरण : भारद्वाजबंधूंचा बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट

बिटकॉइन प्रकरण : भारद्वाजबंधूंचा बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट

Next

पुणे : बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून अमित भारद्वाज याने जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले आहेत. हॉगकाँग आणि दुबईमध्येही मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्याने कोट्यवधी रुपये गुंतविल्याचे तपासात निष्पन्न
झाले आहे़
आर्थिक गुन्हे शाखेने बिटकॉईन या आभासी चलनात देशभरातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या अमित भारद्वाज याच्यासह आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात सोमवारी दाखल केले़ या ४ हजार
पानी दोषारोपपत्रात त्यांनी
यातून मिळविलेला पैसा कसा परदेशात गुंतविला याची माहिती दिली आहे़
गेन बिटकॉईन कंपनीचा संचालक अमित महेंदरकुमार भारद्वाज (वय ३५), त्याचा भाऊ विवेककुमार (३१), साहिल ओमप्रकाश बागला (२८), निकुंज विरेंद्रकुमार जैन (२९), पंकज नंदकिशोर अदलाखा (४०, सर्व रा. दिल्ली), काजल जितेंद्र शिंगवी (२५,रा. महर्षीनगर, गुलटेकडी), व्यास नरहरी सापा (४६, रा. सापा वाडा, भवानी पेठ), हेमंत चंद्रकांत भोपे (४६,रा. डीएसके विश्व, धायरी), हेमंत विश्वास सूर्यवंशी (५१,रा. कासा सोसायटी, बाणेर) अशी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध राज्यातील पहिला गुन्हा पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

दुबई, हाँगकाँगमध्ये मालमत्ता
- बिटकॉईनमध्ये मिळविलेल्या पैशातून भारद्वाज बंधूनी हॉगकॉग येथील अमेझ मायनिंग अँड ब्लॉकचेन रिसर्च व ग्रिन ओव्हरसिल, बीव्हीआय येथील क्रिप्टोकॅपिटल कंपनी, इस्टोनिया येथे क्रिप्टो एएमसी, दुबई येथील एबी मार्केटिंग कन्सल्टंसी एफझेडइ, अमेझ मेगा अलायन्स व युएसए येथील एबीसी रिसर्च अँड कन्सल्टंसी या कंपन्यांमध्ये वर्ग केले आहे़
- तसेच दुबईतील जुमेरा लेक टॉवर येथे ३१ व्या मजल्यावर ७ आॅफिसेस त्याने जानेवारी २०१८ मध्ये घेतले़ त्यासाठी १७ कोटी रुपये, मरिन प्रिन्सेस टॉवर येथे ५८ व्या मजल्यावर ४ आॅफिसेससाठी २ कोटी १२ लाख रुपये, बिझनेस बे, तमानी टॉवर येथे ४ आॅफिसेससाठी ३ कोटी ४० लाख, बुर्ज खलिफातील फ्लॅटसाठी ५ कोटी १० लाख रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे़

Web Title: Bitcoin Case: Bharadwaj brother's Flat in Burj Khalifa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.