पुण्याजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, 8 गाड्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 08:27 AM2021-07-10T08:27:48+5:302021-07-10T08:48:03+5:30

साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला माल ट्रक ( क्रमांक: डी डी ०१ सी ०४६७) आज सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास  समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

Bizarre accident due to loss of truck driver near Pune, major damage to 4 vehicles | पुण्याजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, 8 गाड्यांचे मोठे नुकसान

पुण्याजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, 8 गाड्यांचे मोठे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देसिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींची माहिती घेत आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली आहे.

पुणे/धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. ह्या विचित्र अपघातात एकूण आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी साडे सातच्या सुमारास नवले पुलाजवळ ही घटना घडली. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला माल ट्रक ( क्रमांक: डी डी ०१ सी ०४६७) आज सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास  समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, ट्रकने समोरच असणाऱ्या ४ चारचाकी वाहनांना व ३ रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. तर, ८ गाड्यांचे नुकसान झाले आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींची माहिती घेत आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली आहे.

Web Title: Bizarre accident due to loss of truck driver near Pune, major damage to 4 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.