खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात

By admin | Published: February 14, 2015 03:03 AM2015-02-14T03:03:16+5:302015-02-14T03:03:16+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या उतारावर शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Bizarre accidents of eight vehicles in Khandala Ghat | खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात

खंडाळा घाटात आठ वाहनांचा विचित्र अपघात

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या उतारावर शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती़
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एका खासगी बसचा ब्रेक फ ेल झाल्याने गाडी उतारावर वेगाने समोरच्या कारवर आदळली. या अपघातात तब्बल सहा कार एकमेकांवर पुढे आदळत एका मोठ्या अवजड वाहनाला धडकल्याने विचित्र अपघात झाला़ या अपघातात कोणी जखमी झाले नसले, तरी या अपघातग्रस्त वाहनांमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या क्रेनच्या साहाय्याने ही वाहने बाजूला केली़ मात्र, अवजड वाहनांचा आॅईल पॉईप तुटल्याने व वाहन हटविण्यास वेळ लागल्याने महामार्गावर सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ रात्री साडेआठच्या सुमारास हे अवजड वाहन बाजूला करण्यात आले़ द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. अपघातानंतर वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)

Web Title: Bizarre accidents of eight vehicles in Khandala Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.