पुण्यात नवाब मलिकांविरोधात भाजपचं आंदोलन; बॅनरवर मराठी भाषेची ऐशीतैशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 03:02 PM2022-02-24T15:02:43+5:302022-02-24T15:03:14+5:30
पुण्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले
पुणे: नवाब मलिक यांना काल तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून नवाब मालिकांना पाठिंबा दर्शवला जात असल्याचे दिसून आले.
आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. त्यातच भाजपच्या नेत्यांनी नवाब मलिकांच्या अटकेनंतर राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात ''दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो'' अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
आता दोन दिवसांनी मराठी भाषा दिन आहे. आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी ''दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो, राजीनामा द्या'' असे बॅनर तयार केले होते. परंतु त्यावर मराठी भाषेच्या व्याकरणाची ऐशीतैशी झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये संबंध आणि राजीनामा, जगदीश असे काही शब्द चुकल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना राजकीय लोकांकडूनच अशा चुका होणे हे लज्जास्पद आहे.
नवाब मालिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी
नवाब मलिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना अटक झाली असून मालिकांचे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे. ज्या दाऊद इब्राहिम ने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. तातडीने नवाब मालिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपापुणे शहराद्वारे आंदोलनातून करण्यात आली. यावेळी माझ्यासह संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येणपुरे, संदिप लोणकर, दत्ताभाऊ खाडे, अर्चना पाटील यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.