Video: पुण्यात भाजपने नवाब मलिकांचा पुतळा जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 02:09 PM2021-11-10T14:09:38+5:302021-11-10T14:10:14+5:30

नवाब मलिक (Nawab Malik) यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही

BJP burns Nawab Malik statue in Pune | Video: पुण्यात भाजपने नवाब मलिकांचा पुतळा जाळला

Video: पुण्यात भाजपने नवाब मलिकांचा पुतळा जाळला

Next

पुणे: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे आरोप केले आहेत. त्याबरोबरच अमृता फडणवीस यांची बेनामी संपत्ती असल्याची कागदपत्रे सादर करणार असल्याचेही सांगितले आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मलिकांच्या आरोपांवर विरोधी पक्षाकडून टीका होऊ लागली आहे.

पुण्यातही भाजपकडून देवेंद्रजी अंगार है अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. पुण्यातल्या कर्वे रस्त्यावर मलिक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुळीक म्हणाले,  १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. ते घडवणाऱ्या आरोपींची प्रॉपर्टी विकत घेण्याचे काम नवाब मालिक यांनी केले आहे. ज्या लोकांनी देशद्रोह केला. या घटनेत शेकडो निरपराध व्यक्तींची हत्या झाली. अशा लोंकाची प्रॉपर्टी विकत घेऊन देशाशी गद्दारी करत नवाब मलिकने देशद्रोह केला आहे. नवाब यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. राष्ट्रवादीने नवाब मलिकची त्वरित हकालपट्टी केली पाहिजे. त्याला मंत्रीपदावर राहता येणार नाही. ज्या शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा दिला. देशद्रोहाला मदत करणाऱ्या अशा मंत्रीबाबत शिवसेनेने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे.

नवाब मलिक यांनी केलेले आरोप 

रियाझ भाटी कोण आहे?

रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला.

समीर वानखेडे आणि फडणवीस यांचे जुने संबंध 

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रकरणाचा तपास भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि फडणवीस यांचे जुने संबंध आहेत. एक अधिकारी २००८ मध्ये नोकरीवर येतो आणि १४ वर्षांत मुंबईबाहेर जात नाही, यामागचं कारण काय..?, असा सवाल मलिक यांनी विचारला.

मुन्ना यादव प्रकरण 

राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असा अतिशय गंभीर आरोप करणाऱ्या मलिकांनी काही जणांची नावंही घेतली. 'मुन्ना यादव नागपुरातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला बांधकाम कामगार बोर्डचं अध्यक्षपद देण्यात आलं. मुन्ना यादव तुमच्या गंगेत न्हाऊ पवित्र झाला होता का?, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.

हैदर आझम बांगलादेशी प्रकरण दाबलं की नाही?

हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो की नाही? त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे की नाही? मालाड पोलीस ठाण्यानं या प्रकरणाचा तपास सुरू केला. बंगाल पोलिसांनी त्याची कागदपत्रं बनावट कागदपत्र ठरवली. तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून तुम्ही ते प्रकरण दाबलं की नाही? त्याच हैदर आझमची तुम्ही मौलाना आझाद फायनान्स महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली की नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती मलिक यांनी केली.

Web Title: BJP burns Nawab Malik statue in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.