Gram Panchayat Result Pune: कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या खुर्चीवर भाजपचा माजी उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 05:44 PM2022-12-20T17:44:33+5:302022-12-20T17:53:28+5:30

निकालामुळे पूर्व हवेलीत भाजपचे वर्चस्व दिसून आले

BJP candidate for Sarpanch post in Kadamwakwasti Gram Panchayat election | Gram Panchayat Result Pune: कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या खुर्चीवर भाजपचा माजी उमेदवार

Gram Panchayat Result Pune: कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या खुर्चीवर भाजपचा माजी उमेदवार

googlenewsNext

पंढरीनाथ नामुगडे

लोणी काळभोर : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली नवपरिवर्तन पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर यांच्या जनसेवा पॅनलच्या १६ उमेदवारांना चितपट करून सरपंच पदाच्या खुर्चीवर शिक्कामोर्तब केला आहे. 

नवपरिवर्तन पॅनलचे चित्तरंजन गायकवाड यांनी जनसेवा पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना काळभोर यांना २५२० मतांनी पराभूत करून विजय मिळवला आहे. या निकालामुळे पूर्व हवेलीत भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. नवपरिवर्तन पॅनलमधून सहा प्रभागातून १७ पैकी १६ उमेदवार भरघोस मताने विजयी झाले आहेत. तर एक उमेदवार शुल्लक मतांवरून पराभूत झाला आहे. तर जनसेवा पॅनल मधून नंदकुमार काळभोर हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा पाठिंबा असलेले भारतीय जनता पक्षाच्या माजी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना काळभोर यांचा तब्बल २५२० मतांनी पराभव केला आहे. नवपरिवर्तन पॅनलने सत्ता राखण्यासाठी तर जनसेवा पॅनलने सत्ता मिळवण्यासाठी साम,दाम,दंड या तीनही पर्यायाचा वापर निवडणुकीत केला होता. चित्तरंजन गायकवाड यांच्या नवपरिवर्तन पॅनलला पराभूत करण्यासाठी जनसेवा पॅनलमध्ये कदमवाकवस्तीसह लोणी काळभोरमधील काही नेते मंडळींनी दंड थोपटले होते. या सर्व विरोधाला नवपरिवर्तन पॅनलकडुन विजयीरूपात उत्तर देण्यात आले.

नवपरिवर्तन पॅनलचे १६ विजयी उमेदवार

प्रभाग १ - आकाश धनंजय काळभोर,लोंढे सिमिता आगतराव,कोमल सुहास काळभोर.

प्रभाग २-बिना तुषार काळभोर, मंदाकिनी सूर्यकांत नामुगडे,राजश्री उदय काळभोर.

प्रभाग ३-दिपक नवनाथ आढाळे,सुनंदा देविदास काळभोर.

प्रभाग ४-नंदकुमार कैलास काळभोर,नासिरखान मनूलाखान पठाण,रुपाली सतीश काळभोर.

प्रभाग ५- स्वप्नेश शिवाजी कदम,अविनाश विजय बडदे,सोनाबाई अशोक शिंदे.

प्रभाग ६ -योगेश भाऊराव मिसळ,सलीमा कलंदर पठाण,राणी प्रीतम गायकवाड.

Web Title: BJP candidate for Sarpanch post in Kadamwakwasti Gram Panchayat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.