काकडे गटाच्या बैठकीची पालकमंत्र्यांकडून दखल; पुणे महापालिकेत बोलावली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:26 PM2017-12-04T12:26:40+5:302017-12-04T12:32:15+5:30
सोमवार दि. ०४ नोव्हेंबर सायंकाळी महापालिकेत भाजपा नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. पालिकेतील पक्ष कार्यालयात ५ वाजता ही बैठक होणार आहे.
पुणे : महापालिकेतील घटनांची पालकमंत्री गिरीश बापट यांनी गंभीर दखल घेतली असून आज (सोमवार दि. ०४ नोव्हेंबर) सायंकाळी महापालिकेत भाजपा नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. पालिकेतील पक्ष कार्यालयात ५ वाजता ही बैठक होणार आहे. समान पाणी योजनेवरून उठलेले वादळ शमवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसात पलिकेत काकडे समर्थक नगरसेवकांचा वेगळा कंपू होऊ लागला आहे. पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. वेगळी बैठक घेऊन त्यांनी खासदार संजय काकडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यावर काकडे यांनी त्यांना पालिकेत लक्ष घालू असे सांगितले.
त्यामुळेच बापट यांनी ही बैठक आयोजित केली आहे. बापट यांंना त्यासाठी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी राजी केले.
प्रशासनाबद्धलच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींचीही सोडवणूक यात करण्यात येणार आहे. अधिकारी सह्या करत नाहीत, फाइल पेंडिंग ठेवतात. निर्णय देत नाहीत, अतिरिक्त आयुक्त तिसरे पद रिक्त आहे. अशा काही तक्रारीबाबत मंत्री बापट आयुक्तांबरोबर बोलणार असल्याची माहिती मिळाली.