उमेदवारी बापटांना ; साेशल मीडियावर काैतुक शिराेळेंचे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 03:54 PM2019-03-24T15:54:32+5:302019-03-24T16:03:36+5:30
उमेदवारी जरी बापट यांना जाहीर झाली असली तरी साेशल मिडीयावर शिराेळेंच्या पक्षनिष्ठेचे काैतुक हाेत आहे.
पुणे : पुण्यातील लाेकसभेच्या जागेवर भारतीय जनता पार्टीकडून काेणाला उमेदवारी जाहीर हाेणार याची चर्चा सर्वत्र सुरु हाेती. या चर्चांना शुक्रवारी रात्री पुर्णविराम मिळाला. शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झालेल्या यादीत पुण्याच्या जागेसाठी गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपाचे पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळे यांचा पत्ता यामुळे कट झाला आहे. ही उमेदवारी जाहीर हाेताच साेशल मिडीयावर सुद्धा चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवारी जरी बापट यांना जाहीर झाली असली तरी साेशल मिडीयावर शिराेळेंच्या पक्षनिष्ठेचे काैतुक हाेत आहे.
शुक्रवारी बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे भाजपाच्या पक्ष कार्यालयात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले हाेते. सकाळीच शिराेळे यांनी बापट यांना फाेन करुन शुभेच्छा दिल्या हाेत्या. बापट यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा शिराेळे दिल्लीला हाेते, तेथून आल्यानंतर त्यांनी थेट भाजप कार्यालयात येत बापट यांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करीत राहीन. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असेन. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावर साेशल मिडीयावर शिराेळे यांचे काैतुक केले जात आहे. तर बापट यांना काही प्रमाणात ट्राेल देखील केले जात आहे.
2014 साली गाेपिनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव शिराेळे यांना उमेदवारी देण्यात आली हाेती. त्यामुळे यंदा उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिराेळे हे मुंडे समर्थक असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली असा सूर साेशल मिडीयावर एकीकडे उमटत हाेता. तर दुसरीकडे पक्षाने घेतलेला निर्णय शिराेळे यांनी स्वीकारल्याने त्यांचे काैतुक करणाऱ्या पाेस्ट आणि कमेंट्ससुद्धा फिरत हाेत्या. काॅंग्रेस- राष्ट्रवादीचे काही नेते उमेदवारी न मिळाल्याच्या कारणाने भाजपात प्रवेश करत असल्याने शिराेळे यांनी पक्षनिष्ठा दाखवून पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेचे काैतुक करण्यात आले. तर दुसरीकडे बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या पाेस्ट देखील व्हायरल झाल्या आहेत. काॅंग्रेस कुठला उमेदवार देईल त्यावर बापट निवडून येतील की नाही याचा निर्णय हाेईल या पासून ते पुण्यात भाजपा एक लाेकसभा निवडणूक जिंकल्यानंतर दुसरी हरते हा पुणे पॅटर्न असल्याचे म्हणत बापट निवडून येणार नाहीत असे मत व्यक्त केले. तर काहींनी बापट यांना नाही तर माेदींना पाहून मत देणार असल्याचेही म्हंटले आहे.
गिरीश बापट यांना देण्यात आलेली उमेदवारी आणि अनिल शिराेळे यांनी दाखवलेली पक्षनिष्ठा यावर साेशल मिडीयावर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रिया
- पुणेकर तुम्हाला निवडणूक हरवल्यानंतर वाजत गाजत घरी सोडून येईल .
- याला म्हणतात पक्षाचे प्रामाणिक नेते
- मुंडे साहेबांचे समर्थक एवढच गडकरी यांनी पत्ता कट केला. बापट पडणार १००%
- खरच खूपच सुंदर ..खासदार
- तुम्ही खूप काम केलात प्रामाणिकपणाने म्हणून उमेदवारी नाकारली... जनतेची कामे तुम्ही करु शकलात नाहीत.
- सलाम शिरोळे साहेब. तुम्ही खरंच ग्रेट आहात. हीच खरी भाजपाची विचारधारा
- निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता