जेजुरीत भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीानाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:59+5:302021-03-22T04:09:59+5:30
या वेळी पश्चिम महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे, नाशिकच्या आमदार सीमा हिरे, राज्य भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. तेजस्विनी ...
या वेळी पश्चिम महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष जालिंदर कामठे, नाशिकच्या आमदार सीमा हिरे, राज्य भाजपा वैद्यकीय आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. तेजस्विनी अरविंद, जिल्हा भाजपा युवती आघाडीच्या अध्यक्षा निकिता होले, जिल्ह्याच्या ओबीसी युवामोर्चाच्या अध्यक्षा अलका शिंदे, शारदा होले, पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी नीलेश जगताप,सचिन लंबाते, कैलास जगताप, मीनाताई जाधव, दशरथ घोरपडे,राजेश ढवान, प्रसाद अत्रे, श्रीकांत थिटे, माजी सैनिक संघटनेचे प्रकाश भामे, जेजुरी शहरचे अध्यक्ष सचिन पेशवे,गणेश भोसले आदी उपस्थित होते.
जालिंदर कामठे म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींची मागणी करणे ही निंदनीय घटना आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न यामुळे सर्वसामन्य जनता हैराण झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडणीप्रकरणी राजीनामा न दिल्यास भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील, असा इशाराही जालिंदर कामठे यांनी दिला.
आमदार सीमा हिरे म्हणाल्या की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट सचिव वाझे यांना दिले होते असा धक्कादायक गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने निंदनीय घटना आहे. यामुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांचे, महिला व तरुणीवरील अत्याचाराचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. जनतेला त्रास देऊन खंडणी वसूल करणाऱ्या या सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.
२१ जेजुरी आंदोलन
जेजुरी येथील आंदोलनात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करताना.