अकोले ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, अकरापैकी आठ जागांवर दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:35+5:302021-01-19T04:11:35+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे प्रभाग एकमधील केवळ तीनच उमेदवार विजयी झाल्याने एवढ्याच जागेवरच समाधान मानावे लागले आहे. यामुळे अकोले ...

BJP dominates Akole Gram Panchayat, winning eight out of 11 seats | अकोले ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, अकरापैकी आठ जागांवर दणदणीत विजय

अकोले ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, अकरापैकी आठ जागांवर दणदणीत विजय

Next

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे प्रभाग एकमधील केवळ तीनच उमेदवार विजयी झाल्याने एवढ्याच जागेवरच समाधान मानावे लागले आहे. यामुळे अकोले ग्रामपंचायतीत सत्तापरिवर्तन होऊन भाजपप्रणीत पॅनेलचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच अकोले ग्रामपंचायतीत सत्ता होती. मात्र, या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे. यामध्ये प्रभाग एक राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन कोंडीबा सोलनकर,१३६ मतांनी तर विजयी,रुपाली देविदास कोकरे-१४८ बाळूबाई मारूती पडळकर-१६४ मतांनी विजयी.तर प्रभाग दोन मध्ये भाजपचे ज्ञानदेव केरबा दराडे-३१ मतांनी,नकुशा सोमनाथ दराडे-१०२ तर रजनी ज्ञानदेव दराडे-५ मतांनी विजयी. प्रभाग तीनमध्ये भाजपचे संदीप शामराव दराडे-बिनविरोध, तर गौरीहर जगन्नाथ दराडे-१४० मतांनी विजयी, प्रभाग चारमध्ये भाजपचे अनिल बापू शिंदे-६४ मतांनी,तर गणेश श्रीरंग खाडे-१५३ मतांनी, रोहिणी दीपक जगताप-९३ मतांनी असे एकूण भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.या विजयाचे श्रेय भाजप पक्षाच्या सर्व समावेशक कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे भाजपप्रणीत पॅनलचा विजय झाला असून सर्वांना सत्तेत एकत्र घेऊन गावच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे पॅनेलप्रमुख शामराव दराडे, संतोष शिंदे आणि हरिभाऊ दराडे यांनी सांगितले.

अकोले ग्रामपंचायतीच्या आठ जागांवर भाजपप्रणीत पॅनेलचा विजय झाल्याने उमेदवारांनी जल्लोष केला.

Web Title: BJP dominates Akole Gram Panchayat, winning eight out of 11 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.