भाजपा सहकार आघाडी अध्यक्षपदी सचिन दांगट यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:54+5:302021-01-18T04:10:54+5:30
वारजे : भारतीय जनता पार्टीची सहकार आघाडी पुणे शहर कार्यकारिणी शहर कार्यालय शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केली. याप्रसंगी ...
वारजे : भारतीय जनता पार्टीची सहकार आघाडी पुणे शहर कार्यकारिणी शहर कार्यालय शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जाहीर केली.
याप्रसंगी धीरज घाटे, गणेश घोष, नगरसेवक दीपक पोटे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर उपस्थित होते.
सहकार आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी सचिन दशरथ दांगट यांची, तर उपाध्यक्षपदी गिरीश घोरपडे, निळकंठ शेळके, दिलीप पर्वतीकर तसेच सरचिटणीस पदावर दीपक दुधाणे, अजित देशपांडे, डॉ. धनंजय जोशी, चिटणीसपदी माया गायकवाड, बरखा लाहोटी, बिपीन रोठे आणि कोषाध्यक्षपदी सुभाष आगरवाल यांच्यासह ३१ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
नवनियुक्त पदाधिकारी यांना काय काम करावे, कसे करावे याविषयी जगदीश मुळीक, धीरज घाटे, गणेश घोष आणि दीपक पोटे यांनी मार्गदर्शन केले.
कोट
शहरातील विविध भागातून पदाधिकारी निवड होत असताना विविध समाजाला प्रतिनिधित्व देण्याचे काम केले जात आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमार्फत सहकारविषयक योजना पोहोचविणे, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे अशा अनेक गोष्टी भाजपाचे वतीने केल्या जाणार आहे.
- सचिन दांगट, पुणे शहराध्यक्ष, सहकार आघाडी
चौकट
अनिल कवडे यांची घेतली पदाधिकाऱ्यांनी भेट
या टीमची निवड होताच दुसऱ्याच दिवशी सर्व पदाधिकारी कामाला लागले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नोंदणी आयुक्त (सहकार निबंधक) अनिल कवडे यांची भेट घेऊन पुणे शहरात डीम्ड कन्व्हेयन्सबाबत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून यांची संख्या वाढवण्यात बाबत मार्गदर्शन घेण्यात आले.
फोटो ओळ : भाजप सहकार आघाडी कार्यकारिणी सदस्यांसह अध्यक्ष सचिन दशरथ दांगट व शहराध्यक्ष जगदीश मुळीक.