भाजप चित्रपट आघाडी शहराध्यक्ष रोहन मंकणीला अटक; बंद बँक खात्यांची माहिती, अब्जावधींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:36 PM2021-03-16T20:36:50+5:302021-03-16T20:47:52+5:30

या प्रकरणात एकुण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

BJP film city president Rohan Mankani in custody; Fraud of billions by taking information of closed bank accounts | भाजप चित्रपट आघाडी शहराध्यक्ष रोहन मंकणीला अटक; बंद बँक खात्यांची माहिती, अब्जावधींची फसवणूक

भाजप चित्रपट आघाडी शहराध्यक्ष रोहन मंकणीला अटक; बंद बँक खात्यांची माहिती, अब्जावधींची फसवणूक

googlenewsNext

पुणे : बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्कीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. भाजपाचा चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष व अभिनेते रवींद्र मंकणी यांचा पुत्र रोहन मंकणीचाही त्यात समावेश आहे.२० मार्च पोलीस कोठडी दिली आहे.   

रोहन रवींद्र मंकणी (वय ३७, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय ३४, रा. अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय ३४, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय ३७, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय ३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय ४५, रा. वाशीम)राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२, रा. औरंगाबाद) परमजित सिंग संधू (वय ४२, रा. औरंगाबाद) व अनघा मोडक (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या आरोपींपैकी ४ जण आयटी इंजिनिअर आहेत. या सर्वांनी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर बँकेतील डोरमंट खात्याचा डेटा मिळविला. या सर्व बँक खात्यात जवळपास २अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. गेले काही दिवस सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाईटस येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना मिळाली. बातमीची खातजमा करुन पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात तेथे एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर काही वेळाने आणखी पाच पुरुष व एक महिला आली.

पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्ल्क असलेल्या बँक खात्यांचा डाटा मिळाला. रोहन रवींद्र मंकणी याने हा डाटा घेऊन पैसे देणारी व्यक्ती सिंहगड रोडवर राहणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस सिंहगड रोडवरील इमारतीत गेले. तेथे रोहन मंकणी याने सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या सर्वांकडून ११ मोबाईल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार वाकचौरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, महादेव कुंभार, उपनिरीक्षक सागर पडवळ, अमित गोरे, अनिल डफळ, अंमलदार संदेश कर्णे, नितेश शेलार, प्रसाद पोतदार, नितिन चांदणे, अनिल पुंडलिक, शुभांगी मालुसरे, ज्योती दिवाणे या पथकाने केली.

Web Title: BJP film city president Rohan Mankani in custody; Fraud of billions by taking information of closed bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.