दौंड बाजार समितीवर तब्बल ६० वर्षांनी भाजपचा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:58 PM2023-05-25T17:58:40+5:302023-05-25T17:58:50+5:30
हवेली बाजार समिती नंतर पुणे ग्रामीण मध्ये भाजपने आमदार कुल यांच्या प्रयत्नाने एकमेव दौंड बाजार समिती वरती सत्ता मिळवली
केडगाव : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे गणेश जगदाळे व उपाध्यक्षपदी भाजपाचे शरद कोळपे विजयी झाले आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून ६० वर्षाच्या इतिहासात भाजपाने पहिल्यांदाच झंडा फडकवला आहे. हवेली बाजार समिती नंतर पुणे ग्रामीण मध्ये भाजपने आमदार कुल यांच्या प्रयत्नाने एकमेव दौंड बाजार समिती वरती सत्ता मिळवली.
गेली २३ वर्षाच्या इतिहासामध्ये आमदार कुल यांनी पहिल्यांदाच दौंड बाजार समितीमध्ये शिरकाव केला.नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये १८ संचालकांच्या मधून राष्ट्रवादी व भाजपाचे प्रत्येकी ९-९ सदस्य निवडून आले. आठवड्याभरापुर्वी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित संचालक संपत निंबाळकर यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीची १ जागा कमी झाली होती. त्यानंतर आज निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीमध्ये निर्धारित वेळेमध्ये भाजपाचे गणेश जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाळासाहेब शिंदे तर शरद कोळपे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वर्षां मोरे यांच्यामध्ये यांनी अर्ज दाखल केले. भाजपाचे गणेश जगदाळे व शरद कोळपे यांना प्रत्येकी ९ राष्ट्रवादीचे बाळासाहेब शिंदे व वर्षा मोरे यांना प्रत्येकी ८ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे यांनी जगदाळे व शरद कोळपे यांना विजयी घोषित केले. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नवोदित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.