ठरलं! पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:30 PM2023-02-04T12:30:10+5:302023-02-04T12:57:29+5:30

आता येथील मतदारसंघात निवडणुकांचा धुरळा उडणार हे निश्चित झालं आहे. 

BJP has announced the names of candidates for both the by-elections in Pune ashwini laxamn jagatap and kasba peth | ठरलं! पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट

ठरलं! पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा, लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला तिकीट

googlenewsNext

पुणे - भारतीय जनता पक्षाने पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय पक्ष कार्यालयातून दोन्ही नावांची घोषणा झाली असून चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, आता येथील मतदारसंघात निवडणुकांचा धुरळा उडणार हे निश्चित झालं आहे. 

आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करत आहे. परंतु विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यातच भाजपनेही बैठक घेण्यास सुरुवात केली uहोती. पुण्यात आज भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली आणि या पोटनिवडणुकांसाठी उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, भाजपच्या केंद्रीय् कार्यालयातून पुण्यातील या दोन्ही जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. 

Web Title: BJP has announced the names of candidates for both the by-elections in Pune ashwini laxamn jagatap and kasba peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.