गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 08:59 PM2023-02-16T20:59:16+5:302023-02-16T20:59:48+5:30

कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली हाच भाजपचा पराभव

BJP is playing with Girish Bapat's life by campaigning even in his illness Allegation of NCP | गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप

गिरीष बापटांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळतंय; राष्ट्रवादीचा आरोप

googlenewsNext

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे.ही निवडणूक चुरशीची होणार असून सर्व पक्ष निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न करणार आहेत. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने त्यांनीही जिंकण्याचा निर्धार केला आहे. अशातच तब्बल ५ वेळा कसब्यातून आमदारकी जिंकणारे गिरीश बापट आता आजारपणातही प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पुण्याचे खासदार गिरीष बापट यांना आजारपणात प्रचारात उतरवून भाजप  त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतो यांनी केला आहे. 

जगताप म्हणाले, गिरीश बापट उद्यापासून प्रचारात उतरत आहेत. मुळातच त्यांची प्रकृती अस्वस्थ असताना भाजपने त्यांना प्रचारासाठी येण्याची गळ घातली आहे. गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांना भाजपने पक्षांच्या निर्णयापासून लांब ठेवल. भाजपचे मेळावे, कार्यक्रम यामध्ये साधे त्यांचे फोटोही लावले नाहीत. मात्र आज कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली. हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे.

विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल

१९६८ नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकू अनेक वेळा हरलो पण पक्ष संघटन राहिले. ही निवडणूक चुरशची नाही, ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेली अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्य मानल आहे. आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे. हेमंत चे काम चांगले आहे थोडे नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला आहे. 

बापटांचा झाला होता पराभव 
 
रम्यान १९९२ च्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव झाला होता. काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

Web Title: BJP is playing with Girish Bapat's life by campaigning even in his illness Allegation of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.