'...म्हणून ठाकरे सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येईल'; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 07:51 PM2022-02-12T19:51:49+5:302022-02-12T19:54:35+5:30

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फार काही दिवस टिकणार नाही.

BJP leader Chandrakant Patil said that the Mahavikas Aghadi government in the state will not last very long | '...म्हणून ठाकरे सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येईल'; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

'...म्हणून ठाकरे सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येईल'; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

Next

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० मार्चनंतर सत्ताबदल होईल आणि भाजपाचे सरकार येईल, असं विधान केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फार काही दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसेच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: BJP leader Chandrakant Patil said that the Mahavikas Aghadi government in the state will not last very long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.