धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:59+5:302021-01-19T04:13:59+5:30
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी (दि. १८) राज्यभर ...
पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी (दि. १८) राज्यभर आंदोलन करण्यात आले.
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अँड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आदी या आंदोलनात सहभागी होत्या.
उमा खापरे म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभागासारखे खाते सांभाळणारे धनंजय मुंडे हे स्वत:हून नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. महिलांचा आदर ठेवून सन्मानाविषयी बोलणारे ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंडेंचा राजीनामा घेतील अशीही अपेक्षा होती. मात्र त्यांनीही मुंडेंना अभय दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी आमची मागणी आहे.