Pune: निधी खर्चाला भाजप आमदार पुण्यात भारी! राष्ट्रवादी पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:44 PM2021-12-07T16:44:10+5:302021-12-07T17:21:42+5:30
सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदारांना वर्षाला चार कोटी रुपयांचा निधी दिला जातो. सन २०२०-२१ या आर्थिक ...
सुषमा नेहरकर- शिंदे
पुणे : मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदारांना वर्षाला चार कोटी रुपयांचा निधी दिला जातो. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी पुण्यातील आठ आमदारांचे मिळून बत्तीस कोटी रुपये पुण्याला मिळतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारकडून निधी येण्यास उशीर झाला. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या आमदारांनी आतापर्यंत २९ कोटी ४७ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली. प्रत्यक्षात यातल्या ८ कोटी ८९ लाख रुपयांच्या कामांनाच आतापर्यंत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
येत्या चार महिन्यांत शिल्लक साठ टक्के म्हणजे २३ कोटी ११ लाख रुपये खर्च करण्याचे आव्हान आमदारांपुढे असेल. कामांचे प्रस्ताव देऊन निधी खर्च करण्यात भाजपचे आमदार आघाडीवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
आमदार निधी खर्चाचा लेखाजोखा
सुनील टिंगरे, वडगावशेरी
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : ३ कोटी ३० लाख
मंजूर कामे : ०
चेतन तुपे, हडपसर.
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : १ कोटी ७६ लाख
मंजूर कामे : ७३ लाख
सुनील कांबळे, पुणे कॅन्टोमेंट
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : १ कोटी ७९ लाख
मंजूर कामे : ७९ लाख
मुक्ता टिळक, कसबा पेठ
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : ३ कोटी ७ लाख
मंजूर कामे : १ कोटी ९ लाख
चंद्रकांत पाटील, कोथरूड
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : ६ कोटी ७१ लाख
मंजूर कामे : १ कोटी २४ लाख
भीमराव तापकीर, खडकवासला
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : ५ कोटी ७८ लाख
मंजूर कामे : ४१ लाख
सिद्धार्थ शिरोळे, शिवाजीनगर
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : २ कोटी ९३ लाख
मंजूर कामे : २ कोटी १८ लाख
माधुरी मिसाळ, पर्वती
मंजूर निधी : ४ कोटी
प्राप्त निधी : ३ कोटी
प्रस्तावित कामे : ४ कोटी १० लाख
मंजूर कामे : २ कोटी ४२ लाख
माधुरी मिसाळ पुण्यात अव्वल
पर्वती मतदारसंघातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ सर्व आमदारांमध्ये निधी खर्च करण्यात आघाडीवर आहे. मिसाळ यांना तीन कोटींचा निधी मिळाला असताना त्यांनी चार कोटी ४२ लाख रुपयांचे नियोजन केले. प्रत्यक्षात २ कोटी ४२ लाख रुपयांच्या कामांना मंजुरीदेखील मिळाली आहे.
सुनील टिंगरे सर्वांत मागे
वडगावशेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे आमदार निधी खर्च करण्याच्या बाबतीत शहरात सर्वात मागे राहिले आहेत. टिंगरे यांनी तीन कोटी तीस लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. परंतु, यातल्या एकाही कामाला आतापर्यंत प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.