रेमडेसिविरच्या उपलब्धतेसाठी भाजपकडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 11:55 AM2021-04-16T11:55:06+5:302021-04-16T12:04:14+5:30

शहरात संचारबंदी लागू असताना भाजपच्या आंदोलनाला १०-१२ कार्यकर्ते नेते उपस्थित

BJP once again agitates today for the availability of Remedesivir | रेमडेसिविरच्या उपलब्धतेसाठी भाजपकडून आंदोलन

रेमडेसिविरच्या उपलब्धतेसाठी भाजपकडून आंदोलन

Next
ठळक मुद्देआरोग्यमंत्री यांनी स्वत:च्या जिल्ह्याला मात्र रेमडेसिविर पुरवलं

पुणे: पुणे भाजपकडून रेमडेसिविरच्या उपलब्धतेसाठी आज पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज सकाळी हे आंदोलन झाले. महत्वाचे म्हणजे शहरात संचारबंदी लागू असताना भाजपच्या आंदोलनाला १०-१२ कार्यकर्ते नेते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना शहराध्यक्ष जगदीश मुळिक म्हणाले “ राज्य सरकार पुण्याला सापत्न वागणूक देत आहे. आवश्यकता असतानाही पुरेसं रेमडेसिविर पुरवलं जात नाही. दुसरीकडे आरोग्यमंत्री स्वत:च्या जिल्ह्याला मात्र रेमडेसिविर पुरवलं. परिस्थिती बिकट असताना देखील शहराकडे लक्ष न देणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरले आहोत. 

दरम्यान केंद्र सरकारने याबाबत निर्यात बंदी करायला उशीर केला का ? केंद्राकडे पाठपुरावा करणार का याबाबत विचारले असता मुळिक यांनी हा राज्य सरकारच्याच अखत्यारीतला प्रश्न असल्याचा दावा केला.

Web Title: BJP once again agitates today for the availability of Remedesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.