गांधी जयंती ते पुण्यतिथी पुण्यात भाजप काढणार पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 05:26 PM2018-10-02T17:26:16+5:302018-10-02T17:28:58+5:30

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने  पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सेवा स्वच्छता संवाद वारी काढण्यात येणार आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही माहिती दिली आहे. 

BJP organised padyatra from Gandhi Jayanti to Punyatithi at all Pune constituency | गांधी जयंती ते पुण्यतिथी पुण्यात भाजप काढणार पदयात्रा

गांधी जयंती ते पुण्यतिथी पुण्यात भाजप काढणार पदयात्रा

Next

पुणे : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने  पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात सेवा स्वच्छता संवाद वारी काढण्यात येणार आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही माहिती दिली आहे. 

        गांधी जयंती निमित्त आज सकाळी स्टेशन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यासह नगरसेवक सहभागी झाले होते.

         यावेळी गोगावले यांनी सांगितले की, गांधी जयंती ते गांधी पुण्यतिथी म्हणजे ३० जानेवारी २०१९ पर्यंत शहरातील आठही मतदारसंघात टप्प्याटप्प्याने प्रत्येकी १५० किलोमीटरची वारी काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. दर आठवड्यात एक दिवस अशा पद्धतीने  एका मतदारसंघात एकूण १५ दिवस महात्मा  काढण्यात येणार आहे. त्यात सकाळी ५ किलोमीटर व सायंकाळी ५ किलोमीटर अशी दहा किलोमीटर पदयात्रा निघेल. गांधीजींची भजने म्हणत ही वारी प्रवास करेल. शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी सहभागी होतील

Web Title: BJP organised padyatra from Gandhi Jayanti to Punyatithi at all Pune constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.