भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:53 PM2023-01-05T15:53:53+5:302023-01-05T15:54:05+5:30
महागाई नियंत्रणात आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही जनजागर यात्रा काढली
पिंपरी : कोण काय कपडे घालते, याचे आम्हाला देणे - घेणे नाही. महागाई नियंत्रणात आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही जनजागर यात्रा काढली आहे. मात्र, भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक आहे, असा आरोप राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पिंपरी येथे केला.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनजागर यात्रेला पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झेंडा दाखवण्यात आला. महिला धोरण तसेच राजकीय आरक्षण व अन्य निर्णय घेतल्याबद्दल कृतज्ञता म्हणून महिला काँग्रेसच्या वतीने पवार यांचा फुले पगडी, घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला. डेक्कनवरील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण तसेच खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, माजी मंत्री दिलीप वळसे, आमदार चेतन तुपे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर उपस्थित होते.
घरातील महिलेला राजकारणात प्रवेश करू देणार नाहीत
राजकारणातील महिलांबाबत सध्या अत्यंत वाईट बोलले जात आहे. कोणीही यात मागे नाही. एक बोलतो लगेच दुसरा त्याच्यापुढचे बोलतो. हे सगळे उबग आणणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर भविष्यात कोणाच्याही घरचे आपल्या घरातील महिलेला राजकारणात प्रवेश करू देणार नाहीत. त्यामुळे आपण आज निर्धार करू की आपला पक्ष कोणत्याही महिलेबाबत कधीही वाईट उद्गार काढणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेच असे धोरण ठरवायला हवी अशी मागणी मी अध्यक्षांकडे करते आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. - सुप्रिया सुळे, खासदार