'शिवसेना आणि भाजपची युती होणार का?' काय म्हणाले चंद्रकांत पाटील...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 04:53 PM2022-01-05T16:53:39+5:302022-01-05T16:57:52+5:30
मागील दोन दिवसांपासून शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा माध्यमांत आहे...
पिंपरी : दोन भाऊ भांडले, दूर झाले. त्यानंतर ते एकत्रही येऊ शकतात. त्यामुळे राज्यात हिंदुत्त्ववाद्यांनी एकत्र यायला हवे. खऱ्या शिवसैनिकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केले. पुन्हा युती होऊ शकते, यावर सुतावोच पाटील यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पुढाकार घेतल्यास शिवसेनाभाजपाची पुन्हा युती होऊ शकते, असे मत शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा शिवसेना-भाजपची युती होईल का? यावर विचारले. पाटील म्हणाले, ‘‘खऱ्या शिवसैनिकांना आघाडीचा निर्णय पटलेला नाही. त्यामुळे तानाजी सावंत, रामदास कदम आणि अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत जाहिरपणे मत व्यक्त केले आहे. राजकाणात शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही.’’
लॉकडाउन केले तर लोक रस्त्यावर उतरतील-
लॉकडाउन विषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘कोरोनाचा विळखा वाढत आहे. आता लॉकडाऊन परवडणार नाही. दोन वर्षे विद्यार्थी, उद्योग, नोकरदार वर्गाने त्रास सहन केला आहे. लॉकडाऊन केला तर नागरीक रस्त्यावर उतरतील. कडक निर्बंध करायला हवेत. लग्नसोहळे, गर्दीचे कार्यक्रमावर निर्बंध आणावेत. मास्क वापरणार नाहीत. त्यांच्यावर पाचशे नाही तर पाच हजार दंड करायला हवा. निर्बंध कडक करायला हवेत. मात्र, दुर्बिन घेऊन बसू नये.’
अरेरावीमुळे बैठकांना जात नाही-
जनजीवन सुरळीत चालावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. मंदिरे, शाळा बंद, बैलगाडा बंद अशो करून चालणार नाही, नियम पाळून सर्वकाही सुरू ठेवायला हवे. सरकारची अरेरावी चालते म्हणून की कोवीडविषयक बैठकांना जात नाही, असेही पाटील यांनी सांगितले.