ब्राह्मणांना भाजपाने गृहीत धरू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:18 AM2021-02-23T04:18:15+5:302021-02-23T04:18:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाजपाचा ब्राह्मणांबद्दल असलेला कळवळा हे पूतनामावशीचे प्रेम असून ७० वर्षे भाजपाच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भाजपाचा ब्राह्मणांबद्दल असलेला कळवळा हे पूतनामावशीचे प्रेम असून ७० वर्षे भाजपाच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या या जातीला फसवणुकीपलीकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मणांना गृहीत धरू नये. ब्राह्मण जातीतल्या प्रतिष्ठितांची भेट घेऊन पाटील दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
“पाटील यांनी काही ब्राह्मण प्रतिष्ठितांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून ‘अमृत’ महामंडळ प्रस्थापित करण्यात आले होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा प्रस्ताव बारगळला,” असे वक्तव्य केले आहे. त्यावर शिवसेनेने टीका केली आहे.
ब्राह्मण अन्य पक्षांसोबत जाण्याच्या भीतीपोटी पाटील दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत. सत्ता असताना समाजाच्या भल्यासाठी योजना का आणल्या नाहीत, असा सवाल शहरप्रमुख संजय मोरे, संपर्कप्रमुख श्याम देशपांडे, प्रशांत बधे, आनंद दवे, शिरीष आपटे यांनी केला आहे. ‘अमृत’ योजना ही शहरी सांडपाणी, पेयजल याकरिता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणलेली योजना होती. पाटील महाविकास आघाडीवर भाजपा सरकारच्या अपयशाचे खापर फोडत असल्याचे मोरे म्हणाले.